वणी : लायन्स क्लब वणी व लायन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने येथील लायन्स इंग्लिश मिडीयम स्कूल येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी उपाध्यक्ष लायन रमेश बोहरा यांचे हस्ते करण्यात आले,अध्यक्षस्थानी लायन्स चॅरिटेबल ट्रस्टचे कोषाध्यक्ष लायन चंद्रकांत जोबनपुत्रा होते तर प्रमुख अतिथी म्हणून लायन महेंद्र श्रीवास्तव, मॉडर्न पॅथालाजीचे संचालक आतिक सैय्यद तसेच लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन राजाभाऊ पाथ्रडकर, सचिव लायन किशन चौधरी, लायन्स ट्रस्ट चे उपाध्यक्ष लायन बलदेव खुंगर ,प्राचार्य प्रशांत गोडे, कु. काजल आसुटकर व पर्यवेक्षिका संध्या बेडदेवार उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सुदृढ व निरोगी शरीर स्वास्थ्यासाठी लायन्स स्कूलचे व्यवस्थापन व लायन्स क्लबच्या वतीने २०२३-२४ या शैक्षणिक सत्रात आयोजित केलेल्या दंत व नेत्र चिकित्सा शिबीरात २४०० विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली.भविष्यात सुद्धा विद्यार्थ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येईल असे मनोगत लायन राजाभाऊ पाथ्रडकर यांनी व्यक्त केले. तर प्रत्येक विद्यार्थ्याला आपला रक्त गट माहीत असणं आवश्यक असून वैद्यकीय आणिबाणी प्रसंगी त्याचे महत्त्व लक्षात येते अशा आशयाचे प्रतिपादन उद्घाटक लायन रमेश बोहरा, लायन महेंद्र श्रीवास्तव व अध्यक्ष लायन चंद्रकांत जोबनपुत्रा यांनी केले.
रक्तगट तपासणी शिबिराचे प्रास्ताविक प्राचार्य प्रशांत गोडे यांनी केले, लायन्स क्लब चे सचिव लायन किशन चौधरी यांनी आभार मानले तर सौ रंजू झाडे व सौ भारती वानखेडे यांनी सुत्रसंचलन केले.शिबिराला विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



