Type Here to Get Search Results !

वणीत विविध क्षेत्रातिल गौरवांचा सत्कार व प्रबोधन शिबिरास मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद

वणी  :  शिवजन्मोत्सव समिती वणी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा २०२४ आणि भव्य नागरी सत्कार कार्यक्रम दि. १८ फेब्रूवारी २०२४ रोजी घेण्यात आला.

शिवजन्मोत्सव समिती ही गेल्या ६ वर्षापासून शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा साजरा करतात. प्रबोधन शिबिर व कार्यक्रमाचे उद्घाटक संजयभाऊ खाडे अध्यक्ष रंगनाथस्वामी अर्बन निधी लिमिटेड,वणी तर शिवप्रतिमेचे पूजन मा.श्री.विजयबाबू चोरडिया (प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा) यांच्या हस्ते करण्यात आले. विशेष पाहुणे मा.श्री.अशोक भाऊ जीवतोडे   (प्रदेश उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा), मा.श्री.किरणताई संजय देरकर (अध्यक्ष एकविरा महिला पतसंस्था मारेगाव), मा.श्री.अरुणभाऊ राजुरकर (सामाजीक कार्यकर्ते), मा.श्री.उमेशजी पोद्दार (सामाजिक कार्यकर्ते), सौ.काजलताई गायकवाड(रिपाई पश्चिम विदर्भ अध्यक्ष आठवले गट),  मा.श्री.गुरुदेव भाऊ चिडे (भा.ज.पा.पु. मो.तालुका उपाध्यक्ष), मा.श्री.वैभव ठाकरे सर (संचालक ज्ञानदा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र), प्रदिपभाऊ बांदूरकर सामाजिक कार्यकर्ते, मा.श्री.संदीप भाऊ गोहोकार (उपाध्यक्ष आदर्श नागरी सहकारी पतसंस्था वणी), मा.श्री.मिलिंद भाऊ गायकवाड( सामाजिक कार्यकर्ते), मा.श्री.राहुल भाऊ खारकर (प्रदेश सचिव विदर्भ राज्य आंदोलन समिती) उपास्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनिकेत दादा चामाटे माजी अध्यक्ष शिवजन्मोउत्सव समिती वणी, तर सूत्रसंचालन मा.श्री.राजू भाऊ पिंपळकर यांनी केले. 

या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात आले. तसेच सर्व समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विविध नृत्याचे आयोजन शिवजन्मोत्सव समिती वणी द्वारा करण्यात आले होते. 
शिवजन्मोत्सव समिती वणीचे अध्यक्ष साई नालमवार, उपाध्यक्ष नितीन गोरे, सचिव गौरव ताटकोंडावार,ज्यांचे विशेष सहकार्य लाभले समितीचे अध्यक्ष कार्याध्यक्ष रितेश पचारे,रौनक लामसोगे,पुष्कर साहारे,किसन ठाकरे आणि इत्यादी उपस्थित होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad