Type Here to Get Search Results !

शिरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सुगंधित तंबाखू जप्त, LCB ची कारवाई

वणी :  दिनांक १७/०२/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक वणी येथे हजर असतांना पहाटे ०३:०० वा. सुमारास पथकास गोपणीय माहिती मिळाली की, कायर जवळील पठारपुर फाटा येथे एक व्यक्ती त्याचेकडील हिरो कंपनीचे पेंशन मोटार सायकलवर प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु विक्री यक करण्याचे उद्देशाने घेवुन येणार आहे. अशा माहिती वरुन पथकाने पंचासह घटनास्थळी रवाना होवुन कायर ते मुकुटबन  रोडवरील पठारपुर फाट्याजवळ सापळा लावुन थांबले असतांना माहिती प्रमाणे पांढरे चुमडे बांधुन असलेली मोटार ख सायकल येतांना दिल्याने पथकाने मोटारसायकल थांबवून चालकास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव नितीन कवडु राजुरकर वय ३२ रा. नेरड (पुरड) ता. वणी असे सांगीतल्याने त्यास मोटर सायकल वरील पांढरे चुमडया बाबत विचारपुस केली.

          यावेळी त्याने उडवा उडवीची उत्तरे दिल्याने पांढऱ्या चुंगडयाची पाहाणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला मजा १०८ हुक्का शिशा सुगंधीत तंबाखु २०० ग्राम क्षमतेचे ८० पॅकेट, इगल हुक्का शिशा सुगंधीत तंबाखु ४०० ग्राम क्षमतेचे १४ पॅकेट व २०० ग्राम क्षमतेचे २० पॅकेट होला हुक्का शिशा सुगंधीत तंबाखु २०० ग्राम क्षमतेचे ५० पॅकेट, असा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला तंबाखु मिळुन आल्याने नमुद व्यक्तीची अंगझडती घेवून त्याच्या जवळील मोबाईल व मोटर सायकलसह त्यास ताब्यात घेवून पुढील कारवाई करीता अन्न व सुरक्षा अधिकारी यांना पाचारण करुन अन्न सुरक्षा अधिकारी यांनी सविस्तर पंचनामा करुन उपरोक्त नमुद सुगंधीत तबांखु, मोटार सायकल व मोबाईल फोन असा एकुण १,८८,१६०/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी नितीन कवडु राजुरकर वय ३२ रा. नेरड (पुरड) ता. वणी याचे विरुध्द पोलीस ठाणे शिरपुर येथे दिलेल्या फिर्याद वरुन अन्न सुरक्षा माणके व भा.द.वि. चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

     सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक श्री. पियुष जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ श्री. आधारसिंग सोनोने, यांच्या मार्गदर्शनात, सपोनि अमोल मुडे, पोउपनि रामेश्वर कांडुरे, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, योगेश डगवार, सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, रजनिकांत मडावी, सर्व स्था. गु. शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad