Type Here to Get Search Results !

धानोरा (जुना) जिल्हा परिषद शाळेची शाळा व्यवस्थापन समिती गठीत

झरी/प्रतिनिधी :  तालुक्यातील धानोरा (जुना) येथील उच्च प्राथमिक शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. मागील समितीचा कार्यकाळ नुकताच संपल्यामुळे शासन नियमानुसार समितीची निवड करण्यात आली. यामध्ये दोन गटांनी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. अशातच सामाजिक कार्यकर्ते श्री संतोषभाऊ माहुरे यांच्या मार्गदर्शनामुळे शाळा व्यवस्थापन समितीवर वर्चस्व प्रस्थापित ठेवण्यात महाविकास आघाडीला यश मिळाले.
   अध्यक्ष म्हणून दीपक राखुंडे उपाध्यक्ष गंगाधर पवार तर शिक्षकतज्ञ म्हणून गजानन वहिले, सदस्य म्हणून राम म्याकलवार, निलेश गणेश पवार, छाया म्याकलवार, गजानन लक्ष्मण पवार, गीता संदीप राऊत,लता अडेल्लू अंकतवार, बबिता सतिश गावंडे, सविता मनोज भोयर, माधुरी विशाल पवार, यांची बहुमताने निवड करण्यात आली. शाळेचे सचिव म्हणून मुख्याध्यापक अक्षय बासटवार तर निवडणूक अधिकारी म्हणून केंद्रप्रमुख मारोती चुधरी यांनी काम पाहिले. सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतला. सर्वांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad