Type Here to Get Search Results !

लायन्स हायस्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी

वणी, शुभम कडू : 

                    येथील लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली.

      शाळेचे प्राचार्य प्रशांत गोडे व वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या दिपासिह परिहार यांचे हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. मंचावर जेष्ठ शिक्षक राजु पाटील, रविंद्रनाथ लिचोडे, चित्रा देशपांडे उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थीनी गितीका झाडे हिने 'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' हे गाडगे महाराजांचे आवडते भजन सुरेल आवाजात गायले तर फाल्गुनी महाकुलकार हिने 'खर्चु नका देवासाठी पैसा, शिक्षणाला पैसा तोच द्या हो' हे प्रबोधनपर गीत सादर केले.तसेच मित बोहरा,जीया हरणखेडे, आविष्का कडूकर व नम्रता जुनघरे यांनी गाडगेबाबा यांच्या जीवनावर भाषणे दिली. श्री. रविंद्र लिचोडे व प्राचार्य प्रशांत गोडे यांनी ग्राम स्वच्छता व गाडगेबाबांची दशसुत्रे या बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इयत्ता आठवीच्या शिक्षिका निलिमा बावणे यांचे मार्गदर्शनाखाली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.संचालन वैष्णवी भालेराव हिने केले तर निवांत लभाने याने आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad