वणी : श्री संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त वणी शहरातील श्नी संत गाडगेबाबा स्मारक येथे १४८ व्या जयंती महोत्सव आनंदात पार पडला. दिनांक २२ फेब्रुवारीला संत गाडगेबाबा चौक ते संत गाडगेबाबा स्मारक पर्यंत भव्य दिव्य शोभा यात्रा काढण्यात आली. सायंकाळी ०८:०० वाजता सन्मानित पाहुण्यांचा सत्कार व लगेच सांस्कृतिक कार्यक्रम चालू करून लहान मुलाचे नृत्य घेण्यात आले. नृत्य संपल्यानंतर उपस्थित असलेल्या सर्व बंधु भगिनींनी महाप्रसादांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
दि. २३ फेब्रुवारीला सकाळी ०५:०० वाजता संत गाडगेबाबा चौक ते संत गाडगेबाबा स्मारक निळापुर रोड वणी इथपर्यंत ग्राम सफाई. सकाळी ०९:०० वाजता गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून ग्रामीण रुग्णालय वणी येथे फळ वाटप करण्यात आले.
सकाळी ११:३० वाजता कार्यक्रमस्थळी पाहुण्यांचे आगमन सन्मानित केलेल्या पाहुण्यांचे स्वागत मा. संजय रेड्डी बोदकुलवार आमदार वणी विधानसभा, मा. तारेन्द्रजी बोर्डे माजी नगराध्यक्ष वणी भाजपा यवतमाळ जिल्हा अध्यक्ष, मा. विजय बाबु चोरडिया सामजिक कार्यकर्ता, वणी पोलीस स्टेशन चे श्नी, मा, ठाणेदार साहेब. श्नी, मा, दिनकरराव पावडे भाजपा वणी. श्नी, मा, बंडुभाऊ चांदेकर माजी जिल्हापरिषद सदस्य भाजपा.मा, श्नी, नारायण जी गोडे व धोबी समाजाचे सन्मानांनी मंचावर उपस्थित मार्गदर्शक यांचेही स्वागता नंतर पाहुण्यांनी गाडगेबाबांच्या जिवणावर विचार व्यक्त केले.
डॉ. रेट पद्ववी मिळवलेले श्नी. विनोद भाऊ आदे यांचा धोबी समाज कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच रक्तदान हे महादान म्हणल्या जाते असे रक्तदान शिबीर घेण्यात आले या रक्तदान प्रमुखाचे कमेटी कडून सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्रतील सुप्रसिद्ध व्याख्याते प्रखर विचारवंत प्रबोधनकार मा. श्नी, लक्ष्मण दास जी काळे यांचे संत गाडगेबाबा यांच्या विचाराची समाजाला गरज या विषयावर समाज प्रबोधनाचा कार्यक्रमाला सुरवात या प्रबोधन कार्यक्रमाने उपस्थित १०००-१५०० बंधु भगिनींन चे मन जिंकले. लक्की ड्रा च्या बक्षीसाचे वाटप असे बरेच समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन समाजा समोर आदर्श ठेवला.
ह्या सर्व कार्यक्रमाचे आयोजक धोबी समाज सा. सां. संस्था, वणी. रजी. नं.एफ- ५३८१(य) अध्यक्ष, श्नी, राहुल चौधरी. उपाध्यक्ष, श्नी, अनिल खिरकर. सचिव, श्नी, संजय चिंचोलकर. सहसचिव, सारंग बिहारी. कोषाध्यक्ष, श्नी, जनार्दन थेटे. सह कोषाध्यक्ष, श्नी, विनोद चिंचोलकर. सदस्य -सर्व श्नी विजय वाघमारे, ज्ञानेश्वर डोळसकर,भरत बोबडे, रोशन चिंचोलकर, महेश बोबडे, धनराज हिवरकर, प्रशांत पत्रकार, मंगेश चिंचोलकर, सचिन क्षिरसागर, पवण बोबडे या सर्वांच्या एकते मुळे हा कार्यक्रम यशस्वी करण्यात आला या साठी समाजातील काही लोकांची साथ पण मिळाली.
या सर्व कार्यक्रमासाठी एक जुट दाखवून कार्यक्रम यशस्वी केल्या बद्दल मि धोबी समाज संस्थेचा सचिव या नात्याने आयोजेकांचे, तमाम धोबी बंधु भगिनींन चे आभार मानतो.









