वणी, शुभम कडू :
पणन महासंघाची निवडणूक नुकतीच पार पडली . या पणन महासंघाच्या संचालक पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत वसंत जिनिंगचे संचालक संजय खाडे यांनी दणदणीत विजय मिळवला.
पणन महासंघाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत ११ मतदारांपैकी १० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असता यामध्ये संजय खाडे यांना ७ मते मिळाली तर प्रतिस्पर्धी शेखर धोटे याना ३ मते मिळाली. या निवडणुकीमध्ये संजय खाडे संचालकपदी निवडून आले. सहकार क्षेत्रामधील निवडणुकांना महत्त्व खूप असते. त्यामुळे वणी विभागामध्ये संजय खाडे यांच्या निवडीबद्दल कौतुक होत असुन विधानसभेमध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
संजय रामचंद्र खाडे यांची महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्या. नागपूर च्या निवडणुकीत भरघोस मतांनी विजय झाल्याबद्दल स्वागत समारंभ वणी येथील टिळक चौक येथे सायं ०४:०० वाजता पार पडणार आहे .
“आपण दाखवलेल्या विश्वास आणि प्रेमामुळे पणन महासंघाच्या संचालक पदाच्या निवडणुकीत वणी झोनमधून विजय मिळवता आला. निवडणुकीसाठी मदत करणा-या सर्व सहका-यांचे, हितचिंतकांचे व मतदारांचे खूप खूप आभार.” – संजय खाडे



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या