मारेगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील हायस्कुल मध्ये आठव्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थिनीचे एका गावातील २३ वर्षीय युवका सोबत इन्स्ट्राग्रामवर ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात होत त्यांचे प्रेम बहरत गेले. एवढेच नव्हे तर त्यांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या. त्याने लग्नाचे आमिष दाखवत वारंवार तीच्या सोबत शारीरिक सबंध प्रस्तापित झाले.
काही दिवसातच तिच्या पोटात दुखू लागल्याने घरच्या लोकांनी तीला वणी येथील डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी तपासणीतून गर्भधारणा झाल्याचे व गर्भ पोटात असल्याचे सिद्ध झाले. ही बाब कुटुंबातील प्रमुखांना सांगताच प्रकरण समोर आले पिडितेला विश्वासात घेताच त्याच्या सहवासातील सर्वच आपबिती कथन केल्यागत पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार महाविद्यालयीन ३४५६१(A) ३७६ (३)(JN) तरुणावर पोक्सो ५०६ गुन्ह्यानुसार अंतर्गत अत्याचाराचे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. सदर पिडीत विद्यार्थिनी व संशायित आरोपी तालुक्यातील एका गावात वास्तव करतात. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
👉 पालकांनी याकडे लक्ष द्यावे ! 👇👇
* कोणाची संगत आहे ?
तुमच्या मुला-मुलींचे मित्र मैत्रिणी कोण आहेत हे तुम्हाला माहिती हवं. त्याच्या पुढे जाऊन मित्र मैत्रिणींच्या पालकांशी तुमची ओळख हवी. फोनवर का होईना तुम्ही पालक मंडळी संपर्कात असणे महत्त्वाचे आहे. 'आई अबक कडे अभ्यासाला जाते' असं सांगितलं की आई फक्त अबक लाच फोन करून विचारते, माझी लेक तुझ्या सोबत आहे ना. मैत्रिणी काय ऐकमेकींसाठी खोट बोलायला तयार होतात. त्यापेक्षा खात्री करण्यासाठी पालकांना फोन करा, खरंच दोघी मैत्रिणी सोबत आहेत का? कोणाच्या घरी आहेत वैगरे लगेच कळतं.
* सोशल मीडिया अकाऊंट आहे ?
मुलं आजकाल फोनवर फेसबुक इत्यादी सोशय मिडिया अकाऊंट वापरतात. हे मुलांचे अकाऊंट तुमच्या कंप्युटरवर लिंक करून घ्या. काही संशयास्पद वागणूक जाणवली तर तुम्हाला हे अकाऊंट चेक करता येतील. रोज अकाऊंट वर लक्ष ठेवायची गरज नाही, मुलांना तेवढ स्वतंत्र हवं पण गरज पडली तर चेक करता यायला हवं.
* निर्णय घेण्याची क्षमता
नकळत मुलांच्या आयुष्याचे निर्णय त्यांचे पालक घेतात, मुलांना निर्णय घेण्याची सवय नसते. कुठली शाळा, कोणते शिक्षण, कुठे जायचं कुठे नाही पासून ते कोणते कपडे घालायचे इथ पर्यंत सगळं पालक ठरवतात. यामुळे मुलांना निर्णय प्रक्रिया कशी असते तेच कळत नाही. निर्णय घेताना परिणामा बद्दल विचार करायचा असतो हेच त्यांना माहीत नसतं. अल्पवयीन मुलींना 'माझं तुझ्यावर प्रेम आहे, मी तुला सुखात ठेवेन' एवढं एक वाक्य वापरून सहज पळून जायला तयार करता येतं असं का? कारण पळून गेल्यावर हा व्यक्ति आपल्याला कसं सुखात ठेवेल हा विचार त्या करत नाही, सगळ पळून जायचा निर्णय घेतात. मुलांना निर्णय घेण्याची सवय लावा, त्यांच्या निर्णयावर घरात सकारात्मक चर्चा करा, जे योग्य निर्णय असतील त्याला पाठिंबा द्या. काही निर्णय चुकीचे वाटतं असतील तर समजूत काढा, तरीही मुलं निर्णयावर ठाम असतील तर मध्यम मार्ग काढा. मुलांना सांगा, तु ठरवं, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. मुलांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य हवं आणि पालक आपल्या सोबत आहेत हे आश्वासन सुध्दा हवं असतं.
* शिक्षणाचं आणि आर्थिक स्थितीच महत्त्व
सतत अगदी सतत सांगा की शिक्षण पुर्ण करणं महत्त्वाचं आहे. मुलींनी स्वतःच्या पायावर उभं रहायला हवं, चार पैसे कमावता आले पाहिजे. काहीही कारणासाठी शिक्षण सोडायचं नाही, लग्न काय होत राहील, आधी नोकरीची तजवीज कर. असं केल्याने जर कोणी प्रेम प्रस्ताव दिला तर मुली ठामपणे सांगतील मी पळून जाणार नाही, मला अजून शिक्षण पूर्ण करायचं आहे. आजकाल आपल्या इथे खुप वारं आहे की शिकून काही होत नाही, व्यवसाय करावा, गायक, कलाकार किंवा खेळाडू बनलं तर भरपूर पैसा मिळतो. खरं आहे या क्षेत्रात पैसा भरपूर आहे पण मेहनत आणि संघर्ष सुध्दा खूप आहे. काही वेगळं करियर मुलांना करायचं असेल तर ते सुद्धा घरी माहिती हवं. थोडक्यात काय मुलांना ध्येय हवं, लग्न संसार हे लक्ष्य नको, स्वतःची प्रगती हे लक्ष्य हवं.
* शारिरीक बदला बद्दल योग्य माहिती
आजकाल मुलं खूप लवकर मोठी होतात. शारिरीक संबंधा बद्दल माझ्या पिढीला कदाचित कॉलेजमध्ये आल्यावर माहिती मिळाली असेल, आजकाल तर ही माहिती पाचवीत शिकत असलेल्या मुलांना सुध्दा असते. एक पालक म्हणून जर तुम्हाला या विषयावर मुलांशी संवाद साधता येत नसेल तर सरळ त्यांना योग्य व्यक्ती कडे घेऊन जा (councelling). आपण मुलांना लहानपणी लसीकरणासाठी नेतो की नाही मग या विषयावर योग्य मदत का नको ?

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या