Type Here to Get Search Results !

बंड्याचे कुलूप तोडून चोरट्याने शेतकऱ्याचा २५ क्विंटल कापुस केला लंपास

वणी, शुभम कडू : वणी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कळमना शिवारातील एका शेतातील बंड्यातून अंदाजे 25 क्विंटल कापूस चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याबाबतची तक्रार दि.5 डिसेंबर ला वणी पोलीसात दाखल करण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले.

         तालुक्यांतील झरपट येथे प्रविण नारायण महाकुलकार (41) हे आपल्या कुटुंबासह राहतात व शेतमजुरीचे काम करतात. त्यांनी मागील वर्षी सन 2022 मध्ये अशोक दुर्गमवार ( 60) रा. राजुर कॉलरी यांचे राजुर कॉलरी शिवारात असलेले 17 एकर शेत ठेक्याने केले. त्यात त्यांनी कापसाचे पिक लावलेले असुन त्यांना यावेळी 50 क्विंटल कापुस पिकला आहे मात्र कापसाला कमी भाव असल्याने तो कापूस त्यांनी मागील एक महीन्यापूर्वी मित्र सुरेश मोखतार सिंह (65) रा. राजुर कॉलरी यांचे मालकीचे कळमणा शेत शिवारात ताराचे कंम्पाऊंन्ड असलेल्या शेतामध्ये स्लॅपच्या पक्क्या बंड्यात 50 क्विंटल कापुस सुरक्षेच्या दृष्टीने ठेवला होता. दि. 4 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजच्या सुमारास सदर बंड्यामध्ये ठेवलेला कापुस जावुन पाहीला असता तेव्हा कापुस सुरक्षित दिसुन आला.

             पण दुसऱ्या दिवशी दि. 5 डिसेंबर ला सकाळी 9 ते 10 वाजता च्या सुमारास प्रविण च्या मित्राचा फोन की, शेतात असलेल्या ताराचे कंम्पाउंड कापुन बंड्याला असलेले समोरील लोखंडी दरवाज्याला लावलेले कुलुप तोडुन आत प्रवेश करुन अंदाजे 25 क्विंटल कापुस कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला आहे. अशी माहिती मिळताच प्रविण महाकुलकार हे दि. 5 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजच्या सुमारास ज्या बंड्यात कापूस ठेवला होता तिथे जावुन बघीतले असता 50 क्विंटल पैकी अंदाजे 25 क्विंटल कापुस किमंत अंदाजे 1 लाख 63 हजार रुपयेचा कोणीतरी अज्ञात चोराने चोरून नेला आहे. हि घटना दि. 4 डिसेंबर 2023 चे रात्री व 5 डिसेंबर चे पहाटेच्या दरम्यान घडली असावी. प्रविण नारायण महाकुलकार रा. झरपट यांच्या फिर्यादीवरून वणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवी कलम 461,380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad