वणी, शुभम कडू : राजर्षि शाहु महाराज हिंदी विद्यालयात डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाणदिनी मानवंदना देऊन अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी चोपणे, अतिथी श्री.राजेंन्द्र देवतळे व श्री.सुनिल गेडाम होते. अतिथी श्री.राजेंन्द्र देवतळे व श्री.सुनिल गेडाम यांनी शाळेतील विद्यार्थांना मार्गदर्शन केले. शाळेतील बहुतांश विद्याथ्यॆांनी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री.प्रतिश लखमापुरे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी, कर्मचारीवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.प्रभुदास नगराळे, हरिदास बोढाले, हरीष वासेकर यांनी अथक परीश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या