वणी, शुभम कडू : श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणीत) श्री स्वामी समर्थ नगर, चिखलगाव-वणी जि. यवतमाळ येथे श्री दत्त जयंती निमित्त श्री गुरुचरित्र पारायण व अखंड प्रहर-नाम-जप-यज्ञ सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले आहे. या गुरुचरित्र पारायणाला पुरुष व महिला यांची उपस्थिती लक्षणीय असून अबालवृद्ध या सोहळ्यात मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले असून सेवेकरी अहोरात्र काम करत आहेत. बुधवार दि. २० डिसेंबर ते २७ डिसेंबर असा सात दिवसांचा श्री गुरुचरित्र पारायण व अखंड प्रहर-नाम- जप-यज्ञ सोहळा संपन्न होत असून या सोहळ्यामध्ये वणीकर मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. येथे सप्ताह काळात अखंड चोवीस तास नामजप व विणा प्रहारा करण्यात येणार असून सकाळी आठ ते रात्री आठ महिला भगिनी विणा प्रहारा तर रात्री आठ ते सकाळी आठ असा पुरुष सेवेकरी विणा प्रहारा देत आहे.

पहिल्या दिवशी प्रारंभी श्री गुरुचरित्र पारायण (संकल्पयुक्त) प्रधान संकल्प, पारायण करण्यात आले. दि. १९ डिसेंबर, मंगळवार ग्रामदेवता निमंत्रण, मंडल मांडणी, व पुर्वतयारी, दि. २० डिसेंबर, बुधवार, मंडल स्थापना, अग्निस्थापना, स्थापित देवता हवन. दि.२१ डिसेंबर गुरुवार, नित्य स्वाहाकार, श्री गणेश याग, श्री मनोबोध याग. दि.२२ डिसेंबर शुक्रवार नित्य वाहकार, श्री गीताई याग. दि.२३ डिसेंबर शनिवार नित्यस्वाहकार, श्री स्वामी याग. दि.२४ डिसेंबर रविवार, नित्य स्वाहाकार, श्री चंडीयाग. दि.२५ डिसेंबर सोमवार नित्य स्वाहाकार, श्री रुद्र याग, श्री मल्हारी याग याप्रमाणे याग केंद्रात झाले.

आज दि. २६ डिसेंबर मंगळवार नित्य स्वाहाकार, बली पूर्णाहुती दु. १२.३९ वा. श्री दत्त जन्मोत्सव सोहळा होणार आहे. दि. २७ डिसेंबर, बुधवार श्री सत्यदत्त पुजन, देवता विसर्जन अखंड नाम-जप-यज्ञ सांगता समारोह, महानैवद्य आरती असा असणार श्री गुरुचरित्र पारायण व अखंड प्रहर-नाम-जप-यज्ञ सोहळा याप्रमाणे पुढील धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
या सप्ताह काळात गुरुचरित्र, श्रीपाद श्रीवल्लभ, नवनाथ व भागवत पारायण तसेच अखंड श्री स्वामी समर्थ जप,सप्ताह काळातश्री महानैवेद्य आरती व महाप्रसाद) श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण व विणा वादन होणार आहे. तरीही सेवेकरांनी आपला अनमोल वेळ देऊन सेवेत सहभागी व्हावे.
विणा वादन माहिती : विणा हे प्रचंड सामर्थ्य असलेले वाद्य आहे. विणा वादनामुळे देवर्षी नारद यांना विविध पदव्या मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांना तिन्ही लोकात मान सन्मान मिळत होता व प्रवेश मोफत होता. त्यामुळेच या महत्वाच्या सेवेत सेवेकरी मागे राहणार नाही, याची काळजी सद्गुरू मोरेदादांनी घेतली आहे. सेवेकऱ्यातील संकोचरुपी शत्रू हद्दपार होऊन तो सेवेत रुजु व्हावा यासाठी प्रहरेची सेवा सप्ताहात घेतली जाते. तसेच विणा वादनामुळे अनेक वाईट शक्ती दूर पळविल्या जातात.
Whatsapp वर बातम्या मिळवण्यासाठी येथे Click करा.
व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी 👇👇
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या