Type Here to Get Search Results !

नववर्ष २०२४ 'महाराष्ट्र नवनिर्माण सेना' दिनदर्शिकेचे अनावरण राज ठाकरे यांच्या शुभहस्ते संपन्न !

वणी, शुभम कडू : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे दि.२५ डिसेंबर रोजी विदर्भ दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान अमरावती येथील ग्रँड मैफिल इन या हॉटेल मध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत मतदार संघाचा आढावा घेतला. तसेच पक्षनेते राजू उंबरकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नावे सुरू केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज ठाकरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षनेते राजू उंबरकर यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात. तरुणांना, महिलांना रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून दिला गेला. तर अन्य सामजिक उपक्रमाची शृंखला राजू उंबरकर यांच्या माध्यमातून मतदारसंघांत राबविल्या जाते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून करत असलेल्या कार्याची माहिती राज ठाकरे यांना दिली. तसेच या कार्याचे कौतुक करत उंबरकर यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहर उपाध्यक्ष गितेश वैद्य, जेष्ठ सहकारी विलन बोधाडकर, परशुराम खंडाळकर, सूरज काकडे, विकास पवार, अभिजीत नानवटकर यांच्या सह मतदारसंघांतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

📢 ताज्या बातम्यांसाठी
🟢 WhatsApp वर Join करा

Below Post Ad