Type Here to Get Search Results !

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला आयुक्तांनी दिली स्थगिती, कायर सरपंचपदी नागेश धनकसार कायम

वणी, शुभम कडू : तालुक्यातील राजकीयदृष्ट्या म्हत्वाच्या समजल्या जाणाऱ्या कायर ग्रामपंचायतीचे सरपंच नागोराव धनकसार यांचे पद रद्द करण्याच्या यवतमाळ जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला गुरुवारी २१ डिसेंबर ला अमरावती विभागीय आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. कायर ग्रामपंचायत निवडणूक साल सन २०२० -२१ मध्ये नागोराव मारोती धनकसार यांचे पॅनल बहुमताने निवडून आले व नागोराव धनकसार यांची सरपंच म्हणून निवड झाली. विरोधी गटातील अर्जदार यांनी मा अपर जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १६ (२) अन्वये सरपंच नागोराव धनकसार यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केलेले असल्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे म्हणून अर्ज सादर केला. 

Whatsapp वर बातम्या मिळवण्यासाठी येथे Click करा.

            सदरील अर्जावर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेऊन व तहसीलदार वणी यांनी सादर केलेल्या अहवालावर अवलंबून राहून कायर चे सरपंच नागोराव धनकसार यांना त्यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केलेली आहे असे म्हणून त्यांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र घोषित केले. मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशाच्या नाराजीने नागोराव धनकसार यांनी ॲड. अरविंद गुडदे यांच्यामार्फत मा. विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडे अपील दाखल केले. सदरील अपील मा. विभागीय आयुक्त यांच्यापुढे २१/१२/२३ रोजी सुनावणी ठेवण्यात आली. अपीलारथीच्या विधीज्ञांनी उपस्थित केलेले मुद्दे ग्राह्य धरुन मा. विभागीय आयुक्त अमरावती यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशास स्थगिती दिली. अपीलकर्त्य नागोराव धनकसार यांची बाजू ॲड. अरविंद गुडदे यांनी मांडली. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे विभागीय अध्यक्ष देवा पाचभाई, तालुका अध्यक्ष तुकाराम माथनकर व सर्व सरपंच उपसरपंच सदस्यांनी सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

📢 ताज्या बातम्यांसाठी
🟢 WhatsApp वर Join करा

Below Post Ad