Type Here to Get Search Results !

बांधकाम मिस्त्रीचा विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू

मारेगाव/प्रतिनिधी : शहरातील वार्ड क्र.६ मध्ये एका घराचे बांधकामाचे काम सुरु होते. बांधकाम मिस्त्री हा नेहमी प्रमाणे मारेगाव येथे मिस्त्री काम करण्यासाठी आला होता. पण आज दिनांक २३ डिसेंबर ला सायंकाळी चार वाजताच्या सुमारास काम करत असताना अचानक त्याचे हातातील लोखंडी रॉडचा जिवंत ११ केव्ही विद्युत ताराला स्पर्श होऊन जोरदार शॉक लागला, शॉक लागुन तो खाली कोसळला. 

Whatsapp वर बातम्या मिळवण्यासाठी येथे Click करा.

या बांधकाम मिस्त्रीचे नाव प्रफुल विठ्ठल तीवाडे (३३ वर्ष) असून मांगरूळ येथील रहिवासी होता. जवळील नागरिकांनी प्रफुल यास तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यांच्यामागे आई,वडील,पत्नी, मुलगा, मुलगी असा आप्तपरिवार आहे. पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

📢 ताज्या बातम्यांसाठी
🟢 WhatsApp वर Join करा

Below Post Ad