आत्महत्येचे सत्र सुरूच! पुन्हा एका शेतकऱ्याने गळफास लावून केली आत्महत्या
0
मारेगाव/प्रतिनिधी : मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील शेतकऱ्याने आत्महत्या करून स्वत:चे जीवन संपविले. या शेतकऱ्याचे नाव प्रदीप नानाजी अवताडे असे आहे. हा शेतकरी कोलगाव येथील रहिवासी आपल्या कुटूबासह येथे राहत होत्या. शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. पण आज मात्र दिनांक २२ डिसेंबर ला घरच्यांना शेतात जात आहे असे सांगून शेतात गेला तो परत आलाच नाही. शेतात जाऊन त्याने एका झाडाला दोराच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. प्रदीप ने हे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. या घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या