भर रस्त्यात चालत्या कारने घेतला पेट
0
वणी, शुभम कडू : वणी-वरोरा बायपास कडून शहराच्या दिशेने येणाऱ्या कार ने कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील रोडवर आज भर दिवसा चालत्या कारला आग लागली आहे. या कार लागलेल्या ठिकाणापासून अगदी हाकेच्या अंतरावर पेट्रोल पंप आहे तसेच हा रोड अत्यंत वरदळीचा असून आहे त्याचबरोबर हा रोड हायवे असल्यामुळे इथून वणी-वरोरा जाणारी वाहतूक देखील खूप मोठ्या प्रमाणात असते. परंतु सुदैवाने या आगीमध्ये कुठल्याही प्रकारची हानी झालेली नाही मात्र कारचे नुकसान झाले आहे. ही आग लागली कशी याची अजून माहिती मिळाली नाही कदाचित ही तांत्रिक कारणामुळे आग लागली असल्याचे बोलले जात आहे. लोकांना कारला आग लागली दिसतात त्यात क्षणी त्यांनी अग्निशमन दलाला फोन करून पाचारण करून घेतले आणि त्याबरोबरच पोलीस देखील वेळेवर दाखल झाले आहे.


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या