वणी, शुभम कडू : दहावी आणि बारावी ला गुणवत्ता प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थी तसेच कला, क्रिडा, विविध स्पर्धा परीक्षेत यश व प्रावीण्य संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि समाज मेळावा शनिवार दि.२३ डिसेंबर २०२३ रोजी सायं. ०४:०० वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, टागोर चौक, वणी येथे तिरळे कुणबी समाज संघटना तालुका वणी च्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ समाजसेवक व सामाजिक कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असणारे वसंतराव काळे व विद्यार्थ्याना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख वक्ते ज्ञानदा स्पर्धा परिक्षा केंद्र चे संचालक वैभव ठाकरे, प्रमुख उपस्थिती शालिनीताई रासेकर माजी नगराध्यक्षा न.प.वणी, प्रमोदभाऊ इंगोले अध्यक्ष नृसिंह व्यायाम शाळा, ॲड. निलेश चौधरी, कार्तिक देवडे अध्यक्ष तिरळे कुणबी समाज असणार आहेत.
तरीही विद्यार्थी व पालकांनी तिरळे कुणबी समाज संघटना वणी तालुका अध्यक्ष कार्तिक देवडे, सचिव निलेश चौधरी, अशोकराव चौधरी, वैभव ठाकरे, आशिष काळे, संतोषराव भेले यांच्याशी संपर्क करुन, नाव नोंदणी करावी. सर्व समाज बांधवांनी मेळाव्यास उपस्थित राहून मान्यवरांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने समाज बांधवांना करण्यात आले आहे.
तिरळे कुणबी समाजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा व समाज मेळावा
0

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या