Type Here to Get Search Results !

भुडकेश्वर देवस्थान कायर येथे स्वच्छता अभियान राबविले

कायर/प्रतिनिधी : श्री गुरुदेव मानवसेवा बहुउद्देशीय संस्था व बाल सुसंस्कार शिबीर समिती, शिरपूर यांचे संयुक्त विद्यमाने विविध उपक्रमांचे माध्यमातून यात्रा तिथे स्वच्छता हा संकल्प मागीलवर्षी तिर्थक्षेत्र भुडकेश्वर देवस्थान कायर येथे करण्यात आला होता.

यावर्षी दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ कार्तिक पौर्णिमा निमित्त यात्रा संपन्न झाली. दि. ०३ डिसेंबर रोज रविवारला सकाळी ०९:०० वाजता तिर्थक्षेत्र भुडकेश्वर देवस्थान कायर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता अभियानाची सुरुवात संकल्प गीत घेऊन करण्यात आली. मंदिर घरातील स्वच्छता करून यात्रा परिसर पूर्ण स्वच्छ करण्यात आला. 
या अभियानामध्ये मनोहर झाडे ज्येष्ठ प्रचारक, गणेश खाडे श्री गुरुदेव मानवसेवा बहुद्देशीय संस्थाचे उपाध्यक्ष व प्रचारक, राजु भोंगळ श्री मानवसेवा बहुउद्देशीय संस्थाचे सचिव ग्रामगीताचार्य भरत कारडे प्रचारक, वासुदेव निकुरे प्रचारक, भगवान मालेकर प्रचारक, लीलाधर वाभीटकर प्रचारक, दत्तात्रय दोरखंडे, आदे दादा भुडकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष, चौधरीजी, नितीन दादा सरपंच भुडकेश्वर देवस्थान सचिव व माजी सरपंच स्वच्छता अभियानामध्ये उपस्थित होते. या अभियानाचा शेवट राष्ट्रवंदना घेऊन करण्यात आला. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

📢 ताज्या बातम्यांसाठी
🟢 WhatsApp वर Join करा

Below Post Ad