रासा ग्रामस्थांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पक्षनेते राजू उंबरकर यांनी तरुण, महिला, जेष्ठ नागरिक आणि सर्व ग्रामस्थांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात जाहीर स्वागत करून अभिनंदन केले. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या पक्षाचा आमदार असुन सुद्धा मतदारसंघात रोजगार, आरोग्य, रस्ते, वीज यासारख्या प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. परंतु मनसेच्या हातात कुठलाही सत्ता नसतांना मतदारसंघांतील ५ ते ७ हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा विडा मनसेने उचलला होता, आणि तो उद्या ३ डिसेंबरला पूर्णत्वास जातोय. त्याकरिता सर्व अर्जदार आणि गरजूनी ३ तारखेला वणीत उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच आरोग्याची आणि त्यांच्या योजनांचा उडालेला बोजवारा पाहता अनेक गरजू रुग्ण मनसेकडे येतं आहे, त्यांची मदत करत अनेक जीव वाचविण्याचे काम मनसे करत असते. नुकत्याच काल एका १६ वर्षीय मुलीला उपचारासाठी मनसेने केलेली मदत हे सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा दाखला आहे, असे मत पक्षनेते राजू उंबरकर यांनी व्यक्त केले.
यावेळी गावातील ज्येष्ठ नागरीक भाऊराव पाटील पिदुरकर, गंगाधर पाटिल डहाके, प्रा.सुरेश पाटील, गजानन पाटिल भोंगळे, वासुदेव पाटिल पिंपळशेंडे (मा. उपसरपंच) विलास पावडे, हिरामणजी वऱ्हाटे, नामदेव पाटिल कुळमेथे, सत्यनारायण जेऊरकर, वासुदेव चांदेकर, सचिन देठे यांच्या सह मनसेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, विठ्ठल बोथाडे, विलन बोदाडकर, प्रकाश असुटकर, शिवराज पेचे, वैभव पुराणकर, सूरज काकडे, धिरज बगवा, भोला चिकणकर, सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या