वणी, शुभम कडू : बर्थडे आला की कुणीतरी आपल्याला गिफ्ट द्यावं, सरप्राइझ द्यावं, आपला बर्थडे खास असावा असं अनेकांना वाटतं. काही जण तर आपल्या बर्थडेसाठी इतके उत्साही असतात की स्वतःचा बर्थडे स्वतःच खास बनवण्यासाठी प्रयत्न करतात. तुम्हीही तुमच्या वाढदिवसाला काही ना काही खास करत असालच. पण वणीतील या चार मित्रांकडून वेगळ्या पद्धतीने जन्मदिवस साजरा करण्यात आला.
वस्त्रहीन लोगों को वस्त्र दो, गरीब बच्चों की शिक्षा में मदद करो, हर गरीब को शिक्षा देने में योगदान दो, बेघर लोगों को आसरा दो, अंधे, विकलांग, बीमार व्यक्ति की सहायता करो, बेरोजगारों को रोजगार दो, याच संत गाडगे बाबा यांचे विचार आहेत.
संत गाडगेबाबा यांच्या विचारानुसार दि. ०१ डिसेंबरला संजय चिंचोलकर, प्रशांत महाकुलकर, शेखर चिंचोलकर, मनीष बोबडे या चार मित्रांनी जन्मदिनाचे औचित्य साधत श्री संत गाडगेबाबा विचार मंच वणी च्या माध्यमातून दिन, दु:खी, लहान मुलास, कपडे, साडी चोळी आणि किराणा देऊन जन्मदिवस साजरा केला.
तसेच मित्रपरिवाराकडून या चारही मित्रांचा एकत्र जन्मदिवस करायचा असे ठरवले आणि मित्रांच्या जन्मदिनी सर्व मित्रपरिवाराला एकत्र येण्याचे कारण मिळाले. मित्रपरिवाराकडून या चारही मित्रांचा जन्मदिवस साजरा करण्याचे ठिकाण ठरले, अग्रसेन भवन. मित्रपरिवाराकडून संजय चिंचोलकर, प्रशांत महाकुलकर, शेखर चिंचोलकर, मनीष बोबडे यांचा जन्मदिवस साजरा करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आला. यावेळी कैलास बोबडे, अनिल खिरकर, सारंग बिहारी, जनार्दन थेटे, विनोद चिंचोलकर, राहुल चौधरी आणि सर्व मित्रपरिवार शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी खालील Link वर Click करा. 👇👇



टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या