Type Here to Get Search Results !

विद्यार्थीप्रिय शिक्षक तामगाडगे यांचा सेवानिवृत्ती सत्कार


वणी, शुभम कडू : स्थानिक शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालयाचे विद्यार्थीप्रिय शिक्षक रमेश तामगाडगे गुरुवारी सेवानिवृत्त झाले. विद्यार्थीप्रिय आणि शिस्तीचे भोक्ते असलेले तामगाडगे यांनी इथे 26 वर्ष सेवा दिली. तसेच काही वर्ष उपमुख्याध्यापक म्हणूनदेखील काम पाहिलं. यापूर्वी ते चंद्रपूर जिल्ह्यातील कुचना येथेल विद्यालयात शिक्षक होते. भाषा हा त्यांचा आवडीचा विषय. त्यांनी आतापर्यंत मराठी आणि इंग्रजी विषयांचं अध्यापन केलं. त्यांना वाचनाची प्रचंड गोडी आहे. ही सवय त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांमध्येदेखील रुजवली. 

शालेय शिक्षणाबरोबरच यशस्वी जीवनासाठीदेखील त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. अनेक विद्यार्थी त्यांनी घडवलेत. सोबतच गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत तसेच शैक्षणिक साहित्यदेखील दिले. आज त्यांचे शेकडो विद्यार्थी विविध क्षेत्रांत यशस्वीरीत्या कार्यरत आहेत. माझे विद्यार्थी हीच माझी खरी संपत्ती असल्याचं ते आजही म्हणतात. त्यांची शिस्त फार कडक आहे. विद्यार्थ्यांवर उत्तम संस्कार करण्यासाठी ते विविध प्रयोग सातत्याने करत असतात. अनेक विद्यार्थी आजही त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. मुख्याध्यापक क्षीरसागर सर व इतर शिक्षक वृंदांच्या वतीने तामगाडगे यांचा  सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी इतर शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad