मारेगाव/प्रतिनिधी : प्रहार जनशक्ती पक्षाच्या मारेगाव प्रभारी तालुकाप्रमुख पदी शहरप्रमुख अनिकेत चामाटे यांची निवड करण्यात आली. प्रहार जिल्हाप्रमुख बिपिन दादा चौधरी यांनी अनिकेत चामाटे यांची मारेगाव प्रभारी तालुकाप्रमुख पदी नियुक्ती केली.
गोर-गरिबांच्या सुखदुःखात सहभागी राहणारा, त्यांच्या नेहमीच सोबत राहणारा, आपल्या कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करणारा असा नेता आपल्यामध्ये आहे हेच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचे भाग्य म्हणावे लागेल. आजही भाऊंची शहरासाठी शहरातील जनतेसाठी लढण्याची हिम्मत कायम आहे व ते यशासाठी झटत आहेत,ते फक्त जनतेच्या प्रेम आणि विश्वासावर कारण अनिकेत वणी शहरावर, शहरातील जनतेवर प्रचंड प्रेम करतात. सर्वांसाठी अविरत झटणारा, काहीही करण्यास तयारी दर्शविणारा, विकास विरोधकांना खडे बोल सूनवणारा अस हे अद्वितीय नेतृत्व अनिकेत चामाटे. वणी मतदारसंघात आजवर अनेकांनी आपली छाप सोडली पण भाऊंची कार्यपद्धतच न्यारी, विकासासाठी कधीही हिंसक किंवा गैरकायदेशीर मार्ग न अवलंबता न्यायालयीन मार्गाने आंदोलन करून वेळोवेळी जनतेला अर्थात त्यांच्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न भाऊंनी नेहमीच केला. तरुणांना मार्गदर्शन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन व विकासात्मक दृष्टिकोन असणारा असा लोकनेता आजवर मी पाहिला नाही. स्वताप्रति जनतेप्रती राष्ट्रप्रति प्रामाणिक असणारे अनिकेतभाऊ यांचे हात बळकट करणे आज गरजेचे आहे. अनिकेतभाऊ हे वणी मतदारसंघात झंझावात निर्माण करत आहेत.जनतेला युवकांना ते आपले वाटतात.कार्यकर्त्यांना नेहमी हवेहवेसे वाटतात, मतदारसंघातील जनताही त्यांच्यावर भरभरून प्रेम करत आहेत. तरुणांचे तर ते आयकॉनच आहेत. आज राजकारण हे स्वार्थी, मतलबी बनले आहे. यासाठी या सर्वांना यातून बाहेर काढणारा हा एक आशेचा किरण प्रहार कार्यकर्ताना दिसतोय. वणी विधानसभा मतदारसंघातील मारेगाव तालुक्यातील जनता उभी राहिली तर नक्कीच पुढील काळात मतदारसंघाचा भरभरून विकास होईल.
- साई नालमवार, गौरव ताटकोंडावार,
अनिकेत चामाटे मित्रपरिवार

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या