Type Here to Get Search Results !

मनसेच्या आंदोलना समोर वेकोली प्रशासन नरमले, अखेर बस सेवा सुरू



वणी/प्रतिनिधी : वणी नॉर्थ क्षेत्रातील कोलार पिंपरी कोळसाखानी अंतर्गत वेकोलिने कोलार पिंपरी, बोरगाव, ब्राह्मणी व निळापूर ही गावे दत्तक घेतली. या गावांना आवश्यक सोइ सुविधा पुरवण्याची जबादारी वेकोलि प्रशासनची आहे. पण वेकोलि प्रशासन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत असून खदान बाधित क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या गावकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते प्रदूषणाने आरोग्य तर कोळशाच्या धुळीमुळे शेत पिकांचेही मोठे नुकसान होत आहे. वणी-उकनी या मार्गावर अनेक कोळसाखानी असून कोळसा वाहतुकीमुळे मार्गाची दुरावस्था असून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागते. कोळसा वाहतुकीमुळे या रस्त्यावरून शाळेत जाणे येणे करतांना विद्यार्थ्यांना धोकादायक प्रवास करावा लागू नये म्हणून वेकोलिने विद्यार्थ्यांकरिता बस सेवा सुरु केली. परंतु अचानक ही बस सेवा बंद केल्याने विद्यार्थी व पालक, गावकऱ्यांनी मनसेचे नेते राजू उंबरकर यांच्याकडे धाव घेतली. राजू उंबरकर यांना बस सेवा सुरु करण्यास सहकार्य करण्याची मागणी केली. या मागणीस राजू उंबरकर यांनी प्रतिसाद दिला. बस सेवा सुरु करण्याच्या मागणीला घेऊन रस्ता रोको आंदोलनही केले. अखेरीस प्रशासनाने तात्काळ बस सेवा सुरू केली. मनसेच्या आक्रमक पावित्र्यामुळे वेकोलीचे मुजोर प्रशासन नमले व विद्यार्थ्यांना बस मिळाली, सर्व गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी राजु उंबरकर यांचे आभार मानले. यावेळी या आंदोलनात तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, राजू काळे, मंगेश शेंडे, गोवर्धन पिदुरकर, शिरीष भवरे, प्रविण कळसकर, अनंता डाखरे, योगेश काळे, जयश्री उपरे, विद्या शेंडे, अमृता बांगडे, शोभा चामाटे, पोर्णिमा खामनकर, छबूताई खामनकर, सविता मत्ते, अर्चना डाखरे, मनसे सैनिक उपस्थित होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad