वणी (शुभम कडू) : तालुक्यातील येनाडी, येनक, शिवनी, कोलगाव, शेवाळा या गावाजवळून वेकोली ची वाहतूक होत असून त्या वाहतुकीचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. (कापूस एकरी १० क्विंटल, सोयाबीन एकरी १० क्विंटल तूर एकरी ५ किंटल) त्याच बरोबर रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. यामध्ये शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे ही विशेष बाब असताना येथील शेतकऱ्यानी दि. ०१ नोव्हेंबरला वे.को.ली. प्रशासना विरोधात आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. दरम्यानच्या परिस्थिती मध्ये आंदोलकांनी शांततेची भूमिका घ्यावी, झालेल्या नुकसानाची भरपाई वे.को.ली. प्रशासनाकडून मिळवून देऊ असे आश्वासन वे.को.ली. च्या अधिकाऱ्यांनी लेखी दिले व यामध्ये वणीचे तहसीलदार मा. धुळधर साहेब यांनी फोन द्वारे मध्यस्थी करून येत्या ५ दिवसात हि नुकसान भरपाई मिळवून दिली जाईल असे सांगितले. मात्र या घटनेस ८ दिवसांचा अवधी उलटूनही कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते राजुभाऊ उंबरकर यांच्या आदेशाने तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांचेकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी वणीचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. येत्या ८ दिवसांत नुकसान भरपाई ताक्ताळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी असे आदेश वे.को.ली. प्रशासनाला देण्यात यावे अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना वे.को.ली. प्रशासना विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार यांनी दिला. यावेळी शेतकरी, मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई वे.को.ली प्रशासनाने करावी अन्यथा मनसेकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन - फाल्गुन गोहोकार
Tags


