Type Here to Get Search Results !

संत विदेही शंकरबाबा यांचा २७ व्या पुण्यतिथि महोत्सव संपन्न


वणी, ( शुभम कडू ) : वणी शहराला लागूनच असलेल्या चिखलगाव येथील सुपरिचित संत विदेही शंकर बाबा देवस्थान येथे पुण्यतिथी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील करण्यात आले. श्री संत विदेही शंकर बाबा देवस्थान येथे जाहीर कीर्तन व भव्य सत्संग कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेतला. यामध्ये दि.०१ नोव्हेंबरला घटस्थापना, अभिषेक, भजन, शंकर बाबा पदावली तसेच ह.भ.प आकाश महाराज चव्हाण यांचे कीर्तन होते. या धार्मिक कार्यक्रमांना गावकऱ्यांनी मोठ्या प्रतिसाद दिला. 


दि.०१ नोव्हेंबर ते दि.०९ नोव्हेंबर यादरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन चिखलगाव येथे करण्यात आले होते. यादरम्यान काही स्पर्धा घेण्यात आल्या जसे की रांगोळी स्पर्धा, भजन स्पर्धा अशा विविध स्पर्धा इथे घेण्यात आल्या आणि त्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले. त्याबरोबरच मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला. 
दि. ०६ नोव्हेंबरला भव्य अशा महाप्रसादाचा आनंद भाविकांनी घेतला. यादरम्यान श्री संत विदेही शंकर बाबा यांच्या दर्शनासाठी भावीक जिल्हातून, तालुक्यातून, शहरातून चिखलगावात दर्शनासाठी येत होते. या धार्मिक कार्यक्रमामुळे पंचकोशीत संपुर्ण भक्तिमय वातावरण तयार झाले.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad