Type Here to Get Search Results !

धनत्रयोदशीला वणीत पहाटेचे कीर्तन

वणी, शुभम कडू : जैताई मंदिरामध्ये  नागपूर येथील नामवंत कीर्तनकार भास्करबुवा इंदूरकर यांचे कीर्तन आयोजित केले आहे. या कीर्तनाला संवादिनीची साथ अरुण दिवे देणार असून अभिलाष राजूरकर यांची तबल्यावर साथसंगत राहणार आहे. कीर्तनकेसरी भाऊसाहेब शेवाळकर, दादाजी व तुळसाबाई गोहणे आणि गणपतराव व सरस्वतीबाई बिलोरिया यांच्या स्मरणार्थ जैताई मंदिर, विमलताई धोटे यांनी या कीर्तनाचे आयोजन केले आहे.  महाराष्ट्रात फक्त वणीत २२ वर्षांपासून हा कार्यक्रम सुरू आहे. पहाटे ६ वाजताच्या या कीर्तनाचा लाभ बहुसंख्येने घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad