वणी/प्रतिनिधी : यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात भरदिवसा मुख्य चौकात तरुणांनी तलवार हातात घेऊन धुमाकूळ घातला. टिळक चौकातील वनविभागाच्या कार्यालयाजवळ दोन तरुण त्यामध्ये एकाने हातात तलवार तर दुसऱ्याने सत्तुर हातात घेऊन लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार करत होते. आरोपीचे नाव शैलेन्द्र उर्फ शंकर साईनाथ बावने (२५) चिंचोली, चंद्रपुर व बादल राजेश दुपारे (२५) रा.कोंढाण्यवाडी वणी अशी आहेत. या घटनेची माहीती पोलीसांना मिळताच डीबी पथकाने या धुमाकूळ घालणाऱ्या दोन तरुणांना अटक केली. आरोपीजवळ असलेली मोटारसायकल, तलवार आणि सत्तुर पोलिसांकडून जप्त करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किद्रे, ठाणेदार पोलीस निरिक्षक अजित जाधव यांचे मार्गदर्शनात डी. बी. पथकचे सहायक पोलीस निरीक्षक माधव शिंदे, सुदर्शन वानोळे, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, वसिम, गजानन कुडमेथे यांनी केली.


