वणी/प्रतिनिधी : यवतमाळ जिल्ह्यातील वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेकडून (ठाकरे गट) आज सोमवारी जिल्ह्याप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात ठिक-ठीकाणी रस्ता रोको आंदोलन करून पाच तास वाहतुक रोखली.
वणी-ढाकोरी राज्यमार्ग क्रमांक ३७४ ची दयनीय अवस्था झाल्याने रस्त्यालगतच्या शेतातील पीके धुळीने काळवंडून गेली आहे. त्यांची नुकसान भरपाई मिळण्यात यावी, रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्यात यावी. यासह शेतकऱ्याच्या हीताच्या विवीध मागण्या करण्यात आल्या. कापसाला दहा हजार रुपये व सोयाबीनला सात हजार रुपये भाव देण्यात यावा, शेतकऱ्यांना आठ तास विज मिळावी ,अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ मीळावे.
केंद्र सरकारने आकारलेला आयात कर रद्द करावा. कंपनीत काम करणाऱ्या मजुरांचे स्थलांतर प्रमाणपत्राची तपासणी करावी. यवतमाळ रोडलगतचे कोल डेपो हटविण्यात यावे, यासह अनेक मागण्या करण्यात आल्या.
शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात दि. ०६ नोव्हेंबरला चारगांव चौकी, आबई फाटा, ढाकोरी येथे शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काही काळ वाहतुक रोखुन धरली.





