Type Here to Get Search Results !

वणीतील शिंगाडा तलावात ५५ वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू

वणी/प्रतिनिधी : वणी शहरातील शिंगाडा तलावात एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. आज रविवारला सकाळच्या सुमारास नागरिकांना तलावात मृतदेह दिसला. त्यावेळी स्थानिकांनी पोलिसांना या मृतदेहाबातची माहीती दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर व्यक्तीचे नाव अशोक बोढेकर असून वय ५५ वर्षाचे आहे. ही घटना नेमकी कशी घडली याबाबतीची माहीती अद्याप मिळाली नाही. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image