Type Here to Get Search Results !

श्री स्वामी समर्थ केंद, चिखलगाव-वणी येथे निःशुल्क दोन दिवसीय सेवेकरी प्रशिक्षण शिबीरास प्रारंभ,आजचा व्दितीय दिवस

वणी/प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणीत) श्री स्वामी समर्थ नगर, चिखलगाव-वणी जि. यवतमाळ येथे दोन दिवसीय सेवेकरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सेवेकरी प्रशिक्षण शिबिर दि. ०४ नोव्हेंबर रोज शुक्रवार व दि. ०५ नोव्हेंबर रोज शनिवारला सकाळी ०८:०० वाजतापासून ते सायंकाळी ०८:०० वाजेपर्यंत होत आहे. 

या प्रशिक्षणास अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक.येथील ज्येष्ठ सेवेकरी श्री. पाटील सर आणि श्री. पगारे सर मार्गदर्शन करत आहे. या शिबिरामध्ये विविध विभागावार मार्गदर्शन होत आहे. या सेवेकरी प्रशिक्षण शिबिरात देवघर-देव्हारा, प्रश्नोत्तरी, सेवा पितरांची, कुलदेव- कुलदेवीची सेवा, कृषीशास्त्र , बालसंस्कार, हस्तरेषा, सामुद्रिक शास्त्र, वास्तुशास्त्र ,इ. विषयावर मार्गदर्शन होणार आहे. प्रथम दिवशी कुलदेव-कुलदेवी विभाग, सेवा पितरांची आणि प्रश्नोत्तरी विभाग यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. 
आज व्दितीय दिवशी  बालसंस्कार, हस्तरेषा, इ. विभागावार परिपूर्ण मार्गदर्शन करून विविध विषयावर प्रश्नोत्तरी होणार आहे. वणीतील सेवेकरी प्रशिक्षण शिबिर हे निःशुल्क आहे. या प्रशिक्षणास वणी तालुक्यातून, शहरातून, गावातून  सेवेकरी मोठया संख्येने उपस्थित राहून प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवत आहे. तरीही वणी, चिखलगाव व परिसरातील नागरिकांनी या सेवेकरी प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवावा असे आयोजकांच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image