वणी/प्रतिनिधी : येथील सनी तिरूपती कन्नुरवार (२३) रा. जेताई नगर, वणी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. आज सकाळी घरून बाहेर गेले असता, दुपारी त्यांचे नातेवाईकांना मोबाईल ध्वनी वरून महिती मिळाली की, सनी याने वणी-घुग्गुस मार्गावरील निलगिरी बनात एका मोहाच्या झाडाला दुपट्टयाच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही माहिती मिळताच तरुणाचे आई-वडील घटनास्थळी पोहोचले. दरम्यान सनी हा मोहाचे झाडाला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. याबाबत वणी पोलिसांना माहिती देण्यात दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. सनी यांच्या पश्चात आई वडील असा आप्त परिवार आहे. त्याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे..

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या