Type Here to Get Search Results !

उंबरकर यांच्या पुढाकारातून अवंतिका झाली ठणठणीत

वणी, शुभम कडू : मनसे नेते राजु उंबरकर  झरी तालुक्यात दौरा व गाव भेट घेत असताना महादापुर (पोळ) या गावाला  भेट दिली. ग्रामस्थांनी विवीध समस्या मांडत असताना एका १६ वर्षीय एका मुलीला जर्जर आजाराने ग्रासल्याचे सांगण्यात आले. गावातील अवंतिका शंकर आडे (१६  ) या मुलीला अपेंडिक्स हा आजार होता. घरी असलेल्या पैशाच्या अडचणीमुळे कुटुंबियांकडून तिच्यावर योग्य ते उपचार व शस्त्रक्रिया करता येत नव्हती. ही सर्व बाब कुटुंबीयांनी उंबरकर यांना सांगितली.

अवंतिका शंकर आडे वय १६ वर्षे या मुलीला अपेंडीक्स हा आजार झाला होता. गेल्या २ महिन्यापासुन हा त्रास तिला होता. परंतू कुटुंबात असल्याने पैशाच्या अडचणीमुळे कुटुंबियांकडून तिला उपचार देणे शक्य झाले नाही. परिणामी हा आजार वाढत गेला. अखेर या कुटुंबीयांनी मनसे नेते राजु उंबरकर यांना ही परिस्थिती सांगितली. ह्या परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देत उंबरकरानी मुलीच्या आरोग्याची जबाबदारी घेतली.आणि तिचा सर्व वैद्यकीय खर्च करणार असा शब्द दिला. 

              यावर सकारात्मक प्रतिसाद देत उंबरकर यांनी त्यांच्या परिस्थितीची तात्काळ दखल घेत वणीतील एका खाजगी दवाखान्यात अवंतिकाला तात्काळ दाखल केले. आजाराचा परिणाम वाढल्याने तो फुटण्याच्या अवस्थेत आल्याची प्रथम माहिती डॉक्टरांनी दिली. अवंतिका ला रुग्णालयात दाखल करुन योग्य ते उपचार चालु करा आणि तिला बरे करा त्याकरिता लागेल तो खर्च मी देण्यास तयार आहे असा शब्द उंबरकर यांनी डॉक्टरांना दिला. आणि तिच्या संपूर्ण आरोग्याची जबाबदारी स्विकारली. काल तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत अवंतिकावर शस्त्रक्रिया पार पडली आणि ती या संकटातून बाहेर पडली. तीन दिवसाच्या उपचारा नंतर अवंतिका ठणठणीत होउन घरी परतली. अवंतिकाची पैश्या अभावी चालु असलेली आजाराशी झुंज आज उंबरकरांच्या माध्यमातुन संपुष्टात आली आणि तिने यावर मात करत यश मिळवलं.

                उंबरकर यांनी स्वतः उपस्थित राहून तब्येतीची विचारपूस केली. आजवर पक्षनेते राजू उंबरकर यांनी अनेकांना मदत केली. समाजातील पुढाऱ्यांनी त्यांचा आदर्श घेतला तर वावग ठरणार नाही. त्यांच्या या दातृत्वाचे तालुक्यात कौतुक होत आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad