Type Here to Get Search Results !

जन्मदिनानिमित्त हवेत फायरींग करून साजरा केला वाढदिवस

वणी, शुभम कडू : राजूर- भांदेवाडा महामार्गावरील मनोज कश्यप यांच्या शेतात डीजे लावून वाढदिवसाची पार्टीत विदेशी बनावटीची रीव्हालवरनी हवेत फायर केली  असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंन्द्रे यांना मिळाली असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव, सपोनी दत्ता पेंडकर आणि स्टाफ सह पोलिस रात्री २ वाजता घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पार्टितील तरूण व उमेश रॉय हा सुद्धा पळुन जात असताना वणी पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले असता त्याचे जवळ विदेशी बनावटीची रीव्हालवरनी मिळून आली. पोलिसांनी दोन फायर केलेली खाली केस व पिस्टल जप्त केली. आरोपी उमेश रॉय प्रगतिनगर कोलार पिंपरी वणी, यांचेवर कलम ३,७,२५,२७ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.

           सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंन्द्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव, जनार्धन खंडेवार सपोनी मारेगाव, सपोनि दत्ता पेंढकर, सफौ.सुदर्शन वानोळे, पंकज उंबरकर, संतोष आढाव, अमोल अन्नेलवार, अविनाश बनकर, विशाल गेडाम, श्याम राठोड, मो.वसीम, पुरुषोत्तम डडमल, गजानन कुडमेथे, निरंजन खिरडकर, यांनी केली..

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad