वणी, शुभम कडू : युवा सेना (ऊबाठा) गटाचे उपजिल्हाप्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या जन्मदिवसानिमित्त दि. २२ नोव्हेंबर २०२३ ला सकाळी ०६:०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये मुला-मुलींचे दोन गट पाडण्यात आले होते. यावेळी मुलांच्या गटातून क्रिश सतिंदर मिस्त्री याने पहिलं बक्षीस, दुसरे ओम कैलास ढवळे तर तिसरे बक्षीस आकाश श्रावण ठमके यांनी पटकाविले तर मुलींच्या गटातून पहिलं बक्षीस निलिमा विठ्ठल निकोडे दुसरे कोमल गणपत गौरकार तर तिसरे बक्षीस दिपाली गजानन पावडे या मुलींनी पटकाविले आहे. यावेळी विजेत्यांना रोख रक्कम, पारितोषिक व शिल्ड देऊन सन्मानित करण्यात आले.





