Type Here to Get Search Results !

"गणेश-गंगा-गृत्समद" या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन

वणी, शुभम कडू : प्रख्यात साहित्यिक, इतिहास -संस्कृती -धर्म अभ्यासक आणि संशोधक प्रा.डॉ.अशोक राणा लिखीत "गणेश- गंगा -गृत्समद" या संशोधनपर पुस्तकाचे प्रकाशन संपन्न होत आहे.
      जगद्गुरु तुकोबाराय साहीत्य परिषद विदर्भ प्रकाशन व्दारा या पुस्तकाची निर्मीती झाली आहे.सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतीराव फुले यांच्या स्मृतिदिनाच्या पुर्वसंध्येवर हा प्रकाशन समारंभ उद्या दि. २७ नोव्हेम्बरला आयोजित आहे.भुडकेश्वर देवस्थान परिसर कायर येथे दुपारी ११ वाजता हा समारंभ प्रा.अशोक राणा यांचे उपस्थितीत होत आहे.मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली आणि मराठा सेवा संघाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दिपक खामनकर यांचे हस्ते सदर पुस्तकाचे प्रकाशन संपन्न होणार आहे.
   प्रकाशन सोहळ्याला मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष अंबादास वागदरकर, शिरपुर चे ठाणेदार संजय राठोड,प्रा.बाळकृष्ण राजुरकर,प्रा.राहुल तायडे,कायर चे सरपंच नागेश धनकसार,माजी सरपंच रामाजी गोन्लावार,राहुल मानकर,सुभाष गजभिये आदि मान्यवर उपस्थित राहतील. कार्तिक यात्रेच्या दिवसांत आयोजित या प्रकाशन सोहळ्याला रसिक श्रोत्यांनी उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad