वणी, शुभम कडू : प्रहार जनशक्ती पक्षाची संघटनात्मक बैठक दि. २६ नोव्हेंबर ला वणीतील रेस्ट हाऊस येथे संपन्न झाली. सर्वच राजकिय पक्षापेक्षा आगळे वेगळे काम वंदनीय नामदार बच्चुभाऊ कडू करत असुन त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन प्रहार पक्ष १०% राजकारण, ९०% समाजकारण करत असुन यावेळी गावागावात प्रहारच्या शाखा मजबुत करण्याचा निश्चय करण्यात आला. या बैठकीमध्ये शहरप्रमुख अनिकेत चामाटे यांनी मार्गदर्शन केले तर वणी तालुकाप्रमुख नितिन गोरे, झरी तालुकाप्रमुख संतोष सेंगर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी युवक शहरप्रमुख संतोष बोंडे, कामगार शहरप्रमुख सागर थोरात, प्रहार सेवक राजू गागरे, सागर इंगोले, शाखाप्रमुख संजू लाडे, उपाध्यक्ष जगन रासेकर, सचिव गोविंद आत्राम, संघटक जीवन बोबडे उपस्थित होते.


