Type Here to Get Search Results !

जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने दोन बैल ठार

शिरपूर, प्रतिनिधी : आज दि. २७ नोव्हेबर ला शिरपूर येथे दोन बैलांचा जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाला. शिरपूर या गावापासून नवेगाव कडे जाणाऱ्या मार्गावर विद्युत तार तुटलेल्या अवस्थेत असल्याने त्या ताराला बैलांचा स्पर्श झाल्याने दोन बैल ठार झाले तर एक बैल जखमी झाला आहे. उमेश बोंडे यांच्या मालकीचे हे दोन्ही बैल असून या शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्याचे जवळपास तीन लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती शिरपूर पोलिसांनी दिली असून पुढील तपास शिरपूर पोलीस करत आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad