महावितरण कंपनीकडून बऱ्याच समस्या असल्याने या सर्व बाबीचे परिणाम कृषी फिडर आणि गावठाण फिडर वर होत असून यामुळे अघोषित भारनियमन शेतकऱ्यांवर आणि जनतेवर लादले जात आहे.
शेतकऱ्यांसाठी विद्युत पुरवठा करणारी स्वतंत्र महाराष्ट्र कृषी वीज वितरण कंपनी स्थापन करू अशी घोषणा शासनाकडून करण्यात आली. प्रत्यक्षात या शेतकऱ्यांना किंमान ८ तास विज पुरवठा सुद्धा होत नाही. महाराष्ट्र कृषी पंप वीज धोरण २०२० नुसार शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला ८ तास वीजपुरवठा करणे बंधनकारक आहे. मात्र येथील अधिकारी व कर्मचारी आपला मनमानी कारभार चालवत वाटेल तेव्हा पुरवठा चालू आणि बंद करत आहे. जितका वेळ पुरवठा बंद करण्यात येते त्यावेळीचा शिल्लक पुरवठा उर्वरित वेळेत देणे बंधनकारक आहे. कधी कधी कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणा मुळे विजेच्या जोडण्या उलट्या केल्या आहेत त्यामुळे मोटार पंप जळतात. असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतं आहे. ह्या सर्व बाबींमुळे शेतीतील सद्यस्थितीतील पिके जाळून जात आहे. हीच परिस्थिती गावठाण फिडर वर सुद्धा आहे. गावातील वीज पुरवठा वाट्टेल तेव्हा बंद करून सर्वसामन्यांना नाहक त्रास महावितरण कंपनी देत आहे, याचा परिणाम गाव खेड्यातील गावकऱ्यांच्या दैनदिन जीवनावर होत आहे. पिठाच्या गिरण्या, पाण्याच्या बोरवेल, शालेय विद्याथ्र्यांचे ऑनलाईन क्लास, विद्युत उपकरण, मोबाईल चार्जिंग यासारख्या सुविधांवर होत आहे. महावितरणच्या या मुजोर आणि ढेपाळलेल्या कारभारा विरोधात आज दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तहसिल कार्यालयावर भव्य झटका मोर्चा काढण्यात येणार आहे. मनसेचे नेते राजु उंबरकर यांच्या नेतृत्वात मार्डी चौक ते तहसिल कार्यालयावर हजारों शेतकऱ्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी या मोर्चास तालुक्यातील सर्व गावकरी व शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश ढोके करत आहे.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या