Type Here to Get Search Results !

सावित्रीबाई फुले वाचनालयात संविधान दिवस साजरा

वणी, शुभम कडू : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय विठ्ठलवाडी वणी येथे दि.२६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर  यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले. तसेच संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले.

२६ नोव्हेंबर १९४९ मध्ये भारतीय संविधान सभेने भारताची राज्यघटना स्विकारली. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस 'भारतीय संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो. परंतु, संविधान सभेने ही राज्यघटना स्विकारल्यानंतर देशात त्याची अमंलबजावणी होण्यास काही महिने लागले. २६ जानेवारी १९५० रोजी ही राज्यघटना पूर्णपणे लागू करण्यात आली.
राज्यघटना हि १९५० रोजी लागू झाली असली तरी आजही संविधान लागू करण्याचे उद्देश काय याची अनेकांना माहिती नाही त्यामुळे जनजागृती करण्याच्या दृष्टीने प्रत्येक वर्षी २६ नोव्हेंबर रोजी संविधान उद्देशिकेचे वाचन करण्याचे शासनाचे निर्देश आहेत, त्यानुसार संविधान दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी कार्यक्रमाचे व वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. बाळासाहेब राजूरकर तर प्रमुख पाहुणे सभासद नामदेवराव जेनेकर व प्रभाकरराव मोहितकर होते. संचालक प्रा. अनिलकुमार टोंगे, सहा. ग्रंथपाल प्रज्वल गोहोकार आणि वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आणि संविधान उद्देशिकेचे वाचन कोषाध्यक्ष अशोक चौधरी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव प्रा. विजय बोबडे तर उपस्थित्यांचे आभार ग्रंथपाल शुभम कडू यांनी मानले.


व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी 👇👇 




Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

file-0000000055fc81f48cd3d96f3a5119ad