Type Here to Get Search Results !

स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय,(Libraries)कुंभा येथे दिवाळी अंक प्रदर्शनीचे उद्घाटन

मारेगाव, शुभम कडू : तालुक्यातील कुंभा येथे स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाचे वतीने सन २०२३-२४ मधील दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरविले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच अरविंद ठाकरे तर प्रमुख पाहुणे अध्यक्ष रतनचंद सुराणा, उपाध्यक्ष केशव भोयर तसेच उपसरपंच गजानन ठाकरे, सचिव विनोद भंसाळी, सदस्य पुरुषोत्तम उरकुडे, अंगणवाडी सेविका बेबी मत्ते, सिमा वाघ, प्रतिमा नागभिडकर, वैशाली खंडरे, मनिषा चांदेकर, राजेंद्र खैरे, प्रेमकुमार इंगोले,पवन पडोळे हरिष मांडवकर, उत्तम आत्राम व परिसरातील वाचक वर्ग प्रामुख्याने उपस्थीत होते.

अध्यक्ष तथा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करुन अरविंद ठाकरे यांचे हस्ते फित कापून दिवाळी अंक प्रदर्शनीचे उद्‌घाटन करण्यात आले. दिवाळी अंकाचे अवलोकन करित असतांना स्पर्धा परिक्षा पुस्तकांचीही पाहणी करण्यात आली. स्पर्धा परिक्षा पुस्तकांचा लाभ गावातील तसेच परिसरातील विद्यार्थी घेत आहे. त्याप्रमाणेच परिसरातील इच्छुक विद्यार्थ्यांची वाचनालयातील स्पर्धा परिक्षा व इतर ग्रंथसंपदेचा लाभ घ्यावा. दिवाळी अंक प्रदर्शनी पुढील सात दिवस सुरू राह‌णार आहे. याचा गावातील तथा वाचक बंधूनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रंथपाल गजानन कोकुळे यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन दिवाकर कावडे यांनी केले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

📢 ताज्या बातम्यांसाठी
🟢 WhatsApp वर Join करा

Below Post Ad