Type Here to Get Search Results !

वणी बाजार समिती मार्फत सी.सी.आय.ची कापूस खरेदी सुरु

वणी, शुभम कडू : कृषि उत्पन्न बाजार समिती, वणी मार्फत हंगाम २०२३-२४ करीता किमान आधारभुत दराने (हमी दर) दि. २२/११/२३ पासून सी सी आय ची कापूस खरेदी अकोला विभागात प्रथम वणी बाजार समितीचे मुख्य आवारात सुरु करण्यात आलेली आहे. सदर कापूस खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे सन्माननिय सभापती ॲड. श्री विनायकराव पुं. ओकरे, उपसभापती श्री विजय शा. गारघाटे, श्री सचिन कुळमेथे, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, वणी, श्री हेमत ठाकरे सी. सी. आय वणी चे केंद्र प्रमुख व सदस्य सर्वश्री दिलीप बोढाले, मोहन वरारकर, प्रभाकर बोढे, वेणुदास काळे, हेमंत गौरकार, चंद्रकात हिकरे, सतिश बडघरे, रविद्र कोगरे, प्रमोद सोनटक्के याचे शुभहस्ते करण्यात आला. प्रथम शेतकरी श्री हर्षद दिलीप बोढाले, रा पुनवट यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला, शुभारभाचे दिवशी अंदाजे ७८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आलेला असून कापसाला प्रति क्विंटल रुपये ७०२०/- हा भाव देण्यांत आलेला आहे. 
या शुभारंभ प्रसंगी सी सी आय शिदोला ने केंद्र प्रमुख श्री पंकज ठाकरे, राळेगावचे केंद्र प्रमुख श्री अमित कोहळे, भद्रावतीचे केंद्र प्रमुख श्री विजय आकोटकर, खैरीचे केंद्र प्रमुख श्री प्रमोद पाटील, पांढरकवडयाचे केंद्र प्रमुख श्री हर्षल शिंदे, बाजार समितीचे सचिव श्री अशोक झाडे, श्री शैलेश मडावी, सहकार अधिकारी, सहा निबंधक, सह स. वणी, लेखापाल रमेश पुरी, श्री आरीफखाँ रऊफखाँ, निरीक्षक तथा सर्व कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. शेतकरी बंधु यानी आपला कापूस किमान आधारभुत दराने विक्री करीता आणत असताना सोबत अदयावत पिकपेरा असलेला सातबारा व आधार कार्ड (बैंक पासबुक व मोबाईल नंबर लिंक असलेल) आणने अनिवार्य आहे.
तरी सर्व शेतकरी बधुनी सी सी आय ला हमी भावाने कापूस विक्री करणेकरीता दि. २२/११/२३ पासून बाजार समितीचे मुख्य आवारांत आणावा असे बाजार समिती तर्फे आव्हान करण्यांत येत आहे.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Top Post Ad

📢 ताज्या बातम्यांसाठी
🟢 WhatsApp वर Join करा

Below Post Ad