Type Here to Get Search Results !

ग्रंथालय कर्मचारी वेतन व विविध समस्येबाबत आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांना निवेदन

 


वणी / प्रतिनिधी : वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटना वणी, मारेगाव, झरी यांनी ग्रंथालय कर्मचारी वेतन आणि विविध समस्या बाबत निवेदन दिले. यामध्ये सार्वजनिक ग्रंथालयांना तिप्पट अनुदान वाढ मंजुर करावी, ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व सेवा शाश्वती प्रदान करावी, ग्रंथालयाच्या वर्ग बदलास मान्यता देणे, उच्च विद्याविभूषित कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेणे या मागण्या पूर्ण करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे अध्यक्ष सुरेंद्र विधाते, उपाध्यक्ष देवेंद्र भाजीपाले, सचिव प्रमोद लोणारे, सहसचिव सुभाष राखुंडे, कोषाध्यक्ष शुभम कडू, संघटक अरविंद दुधुलकर आणि सर्व सदस्य उपस्थित होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image