Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री एका विशिष्ट समुदायासाठी खास प्रयत्न करतात, पण धनगर आरक्षणाबाबत उदासीन भूमिका


वणी, शुभम कडू : महाराष्ट्र राज्यात सुमारे अडीच ते तीन कोटी धनगर समाज अस्तित्वात आहे. डोंगरदऱ्यात राहणारे, भटकंती करुन उपजिवीका भागवणारे धनगर बांधव आजही विकासापासून वंचित आहेत. कित्येक पिढ्या ही मागासलेपणाची झळ सोसत आहेत. भारतीय राज्यघटनेने धनगर समाजाला एसटी प्रवर्गात स्थान दिलंय, मात्र गेल्या ७० वर्षांमध्ये सर्वच सरकारांनी आरक्षण अंमलबजावणीपासून फारकत घेतली. आज तुमच्या हाती धनगर उद्धाराची संधी आहे. धनगर समाजाने राज्यातील विविध ठिकाणी आमरण उपोषण केले. जिल्हयांपासून ते गाव खेड्यांपर्यंत आंदोलनाचे लोण परसले होते. 


धनगर समाजाच्या उद्धारासाठी ८ योजनांची मागणी
१) धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करा.
२) अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने धनगर आरक्षणाकरिता उच्च न्यायालयात दाखल याचिकेत (याचिका क्र. ४९१९/२०१७) अँड कुंभकोणी यांची कायम नियुक्ती करणे तसेच न्यायालयात तात्काळ व दैनंदिन सुनावणी करता अर्ज दाखल करणे.
३) मेंढपाळांसाठी घोषित केलेल्या दहा हजार कोटींच्या सहकारी महामंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन झाल्या असून लवकरात लवकर सहकार महामंडळाची घोषणा करून योजना कार्यान्वित करण्यात यावी व तसेच स्वतंत्र अध्यक्षाची नेमणुक करणे.
४)'जे आदिवासींना ते धनगरांना' याप्रमाणे घोषित केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या २२ योजनांपैकी काही योजना प्रभावीपणे राबवल्या गेल्या नाहीत व संपूर्ण निधी सुद्धा उपलब्ध झाला नाही त्याबाबत आढावा घेऊन उपाययोजना करणे.५) मेंढपाळांवर होत असलेले हल्ले रोखणे व त्यावर स्वतंत्र कायदा आणून त्यांना संरक्षण देणे तसेच महसूल रेकॉर्ड मधील आरक्षित चराई कुरणे क्षेत्र वार्षिकी प्रति हेक्टर एक रूपया दर आकारणी करून स्थानिक मेंढपाळांना वाटप करणे.
६) बिरोबा मंदिर देवस्थानाच्या श्री बिरोबा देवस्थान, आरेवाडी ता. कवठेमहांकाळ, श्री महालिंगराया देवस्थान, हुलजंती ता. मंगळवेढा, श्री बिरोबा देवस्थान, हुन्नूर ता. मंगळवेढा, श्री विठ्ठल बिरदेव देवस्थान, पट्टणकोडोली ता. हातकणंगले, श्री वाशी अवघडखान देवस्थान, वाशी ता. करवीर) या मुळ स्थानांच्या सर्वांगिण विकासासाठी व भाविकांच्या सोयीसुविधासाठी आणि सुशोभिकरणासाठी २०० कोटी रूपयांचा निधी द्यावा.
७) महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थान असलेले किल्ले वाफगावच्या विकास संवर्धनासाठी सरकारने ताब्यात घेऊन किल्ले वाफगाव विकास आराखडा त्वरित तयार करून त्याला मान्यता द्यावी.
८) ज्या पद्धतीने औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशिव करण्यासाठी तात्काळ व ठोस पाऊले उचलण्यात आली त्याच पद्धतीने अहमदनगर जिल्ह्याच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर नामांतरासाठी प्रयत्न व अंमलबजावणी तातडीने कारवाई करण्याचे निर्देश द्यावे. 
धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी समिती ही नेमली, आरक्षण अंमलबजावणीसाठी ५० दिवसांचा वेळ मागितला पण दिलेल्या मुदतीचे ५० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी शासकीय पातळींवर कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. महाराष्ट्र राज्य प्रमुख म्हणून मुख्यमंत्री पदी असलेले मा.श्री. एकनाथ शिंदे साहेब एका विशिष्ट समुदायासाठी खास प्रयत्न करता मात्र धनगर आरक्षणाकडे उदासीनता दाखवता. मुख्यमंत्री साहेबांनी तातडीने धनगर आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा, अन्यथा धनगर समाजाच्या संविधानिक मार्गाने चालणान्या तीव्र लढ्याला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असे निवेदन मुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे साहेब, यांना मा.तहसीलदार, वणी यांच्या मार्फत देण्यात आले. 

यावेळी पांडुरंग पंडितो,विलास शेरकी, गोर, काशीनाथ पचकटे, विनोद खंडाळकर, राजेश निरे, धनंजय उरकुडे, गुरुदेव चिडे, महेश बुच्यू, सचिन बुच्चे, कल्पक चिडे, बिनसगवाकर, बिंदे, सुरेन्द्र बुच्चे, सुभाष खुजे आणि धनगर बांधव उपस्थित होते. 


Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image