Type Here to Get Search Results !

शेतकऱ्यांना नियमीत विज पुरवठा करा अन्यथा मनसेकडून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार

मारेगाव, शुभम कडू : सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असताना वीजपुरवठा होत नसल्याने ते देणे शक्‍य होत नाही. त्यामुळे रब्बी पिके करपण्याची भीती असल्याने भारनियमन बंद करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मारेगाव तालुक्याच्या वतीने करण्यात आली. वीज कंपनीचे कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून ही मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार, ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाल्यास चार ते पाच दिवस त्याची दुरुस्ती होत नाही. परिणामी ग्रामीण भाग अंधारात राहतो. जनजीवन विस्कळीत होते. ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याबाबत वीज कंपनीचे धोरण नेहमीच उदासीन राहिले आहे. दुसरीकडे वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून मुजोरीची भाषा केली जाते.

रोहित्रातील बिघाड तर दोन आठवड्यापर्यंत निकाली काढला जात नाही. या सर्व समस्या तातडीने निकाली काढाव्यात, अशी मागणी करण्यात आली. कृषिपंपांना देखील नियमित वीजपुरवठा होत नसल्याने सद्यःस्थितीत पीक करपण्याची भीती आहे. दरवर्षी हंगामात पाण्याची उपलब्धता शेतशिवारात राहत नाही, आता मात्र पाणी असताना विजेअभावी ते देणे शक्‍य होत नाही. ग्रामीण भागाशी संबंधित हे दोन्ही प्रश्‍न येत्या आठ दिवसांत निकाली न काढल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी तालुकाध्यक्ष रूपेश ढोके,तालुका उपाध्यक्ष उदय खिरटकर, मार्डी विभाग अध्यक्ष रोहित हस्ते, कुंभा विभाग अध्यक्ष आदित्य बूच्चे, अध्यक्ष चोपन देवेंद्र खिरटकर, गौरव आसेकर,अजय जुनगरी यांच्या सह अन्य पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image