Type Here to Get Search Results !

रेतीची अवैध वाहतूक करणारे ट्रक पोलिसांनी पकडले

वणी, शुभम कडू : चंद्रपूर जिल्ह्यातून वणी येथे चोरट्या मार्गाने रेतीची वाहतूक होत असल्याची विश्वसनीय माहिती ठाणेदार अजित जाधव यांना मिळाली. दोन हायवा ट्रक अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच ठाणेदारांनी पोलिस पथकाला अलर्ट करून लालगुडा चौपाटी परिसरात ट्रॅप रचण्याच्या सूचना दिल्या. पोलिस पथकाने रात्री त्याठिकाणी ट्रॅप रचला आणि वाहनांकडे बारीक लक्ष ठेवले. रात्री १.३० वाजताच्या सुमारास त्यांना एक पांढऱ्या रंगाची बुलेरो व मागून दोन ट्रक वणीकडे येतांना दिसले. पोलिस पथकाने बुलेरो व दोनही ट्रक थांबवून त्यांची झडती घेतली असता ट्रकांमध्ये रेती भरून असल्याचे आढळले. ट्रक चालकांना रेतीचा परवाना व वाहतुकीची पावती मागितली असता त्यांच्याकडे नव्हती. पोलिस पथकाने रेती भरलेले दोन्ही ट्रक व बुलेरो वाहन ताब्यात घेतले. ट्रक चालक स्वप्नील बीजांकुर वेलादे (२७), अक्षय परशुराम पेंदोर (२७) दोघेही रा. बेर्डी जि. चंद्रपूर, बुलेरो चालक रामप्रसाद भिकाराम चौधरी (४५) रा. वरुर जि. चंद्रपूर यांना अटक करून पोलिसांनी त्यांच्यावर भादंविच्या कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधिक्षक पियुष जगताप एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार अजित जाधव, पोलिस अंमलदार सुहास मंदावार, डीबी पथकाचे विकास धडसे, सागर सिडाम यांनी केली. पुढील तपास ठाणेदार अजित जाधव करीत आहे.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image