Type Here to Get Search Results !

नगर वाचनालयात दिवाळी अंक प्रदर्शनीचे उद्घाटन

वणी, शुभम कडू : दर्जेदार दिवाळी अंकांची महाराष्ट्राची परंपरा आहे. दिवाळी अंक म्हणजे वाचकांसाठी पर्वणी असते. या दिवाळी अंकात समाजमनाचे प्रतिबिंब उमटलेले असते, असे विचार येथील उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे यांनी व्यक्त केले. नगर वाचनालयातर्फे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी अंक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे संचालक हरिहर भागवत होते. 

यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे संचालक हरिहर भागवत होते.वाचनसंस्कृती लोप पावत असल्याबाबत काळजी व्यक्त करून स्वतःच्या मुलीवर केलेले प्रयोग व त्यातून तिला वाचनाची लागलेली आवड उपस्थितांना सांगून प्रत्येक पालकाने आपल्या पाल्याला संस्कारित करण्यासाठी त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. वाचनाने विचार करण्याची क्षमता प्राप्त होते. विचार केल्याने जबाबदारीची जाणीव होते. त्यातून सुसंस्कारित पिढी निर्माण होते, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.  

वाचनालयाचे संचालक हरिहर भागवत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून आभार मानले. संचालन सचिव गजानन कासावार यांनी केले. कार्यक्रमासाठी यशस्वितेसाठी वाचनालयाचे ग्रंथपाल देवेंद्र भाजीपाले, सहाय्यक ग्रंथपाल प्रमोद लोणारे, लिपीक राम मेंगावार, कल्पना राठोड यांनी पुढाकार घेतला.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image