Type Here to Get Search Results !

आमदारांना केवळ मलिदा असणाऱ्या कामात इंट्रेस्ट


वणी, शुभम कडू
: गेल्या ३५ वर्षातील एक आमदार सोडला तर प्रत्येक वेळी मतदारसंघानी सत्ताधारी पक्षाच्या आमदाराला निवडून दिले आहे. तरी सुध्दा आज ही प्राथमिक सुविधा यात रस्ते, दवाखाने, बसस्टँड, पाणी, वीज आणि अन्य प्राथमिक गरजांसाठी भांडाव लागते. याच मुख्य कारण येथील लोकप्रतिनिधींची उदासिनता आणि भ्रष्ट वृत्ती आहे अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजु उंबरकर यांनी केली. कायर येथे पार पडलेल्या भव्य पक्ष प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते.

         वणी तालुक्यातील कायर व आजूबाजूच्या गावातील युवकांनी, महिलांनी व ज्येष्ठांनी मनसेत जाहीर पक्षप्रवेश केला. येथील आठवडी बाजाराच्या मैदानात सोहळा पार पडला. दरम्यान सामजिक कार्यकर्ते राकेश शंकावार, प्रा. सुनिल पाटिल, शिवा महाकुलवार, सागर मामिडवार यांनी आपल्या सहकार्यांसोबत मनसे नेते राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश केला. विधानसभेत भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची दुसरी टर्म असून सुद्धा गावखेड्यातील रस्ते, शेतातील पांदन रस्ते, कृषी पंपाचा वीजपुरवठा, रोजगार यासारख्या मोठया समस्यांवर मार्ग निघाला नाही. आमदारांना केवळ मलिदा असणाऱ्या कामात इंट्रेस्ट असून इतर कामाकडे दुर्लक्ष करत आमदार स्वतःचे घर भरत आहे. असा थेट आरोप मनसेचे नेते राजू उंबरकर यांनी यावेळील मनोगतात व्यक्त केले. माझ्याकडे रोज मतदारसंघांतील शेतकरी विवीध समस्या घेऊन येतं असतात. त्यात सर्वात गंभिर समस्या ही कृषि पंपाची आहे यासाठी हवा तितका विज पुरवठा होत नाही तर अनेक ठिकाणीं मागणी करुन सुध्दा डी. पी. मिळत नाही, यामुळे शेतकऱ्याचे हाती आलेले पिके वाळून जात आहे. मात्र याकडे आमदार लक्ष देत नाही. जर हा मुद्दा मनसेने हाती घेतला तर भाजपचे विकास कामे पाहून मनसेचा पोटशूळ उठतो असा तथ्यहीन आरोप मनसे करते. अशी प्रतिक्रीया आमदार महोदय प्रसार माध्यमांना देतात. त्याच बरोबर पांदन रस्ते झालेले नसतांना सुध्दा सर्वत्र पांदन रस्ते झाले अशी खोटी माहिती सुध्दा त्याच्याकडून देण्यात येते. त्यामुळे आमदाराच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात कोण कोणती विकास कामे झाली ती जनतेसमोर येऊन मांडावी. असे आवाहन सुध्दा उंबरकर यांनी यावेळी दिले. 
    कायर मध्ये पार पडलेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात असंख्य युवक- महीला व ज्येष्ठांनी पक्ष प्रवेश करून आगामी सर्व निवडणुकात मनसेला यश मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
     यावेळी मनसे महिला जिल्हाध्यक्षा सौ. अर्चना बोदाडकर, तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, ख. वि. संघाचे सदस्य विनोद कुचनकर, शिवराज पेचे, प्रताप उपरे, राजु बोदाडकर, धिरज पिदूरकर, वैशाली तायडे, राकेश शंकावार, विलन बोदाडकर, विट्ठल हेपट, कैलास निखाडे, संदीप गुरनुले, सारंग बोधले, अजय शेंडे, शंकर पिंपळकर, लक्कि सोमकुंवर, हिमांशू बोहरा, वैभव पुरानकर, गौरव पुरानकर यांच्या सह असंख्य नागरीक व मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Below Post Ad