Type Here to Get Search Results !

प्रहार जनशक्ती पक्षाची भालर येथे शाखा स्थापन


शुभम कडू, वणी : भालर येथे प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा दि. ११ नोव्हेंबर ला स्थापन करण्यात आले. यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी भालर येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. शाखाप्रमुख पदी संजू भाऊ लाडे उपाध्यक्षपदी जगन भाऊ रासेकर,सचिव पदी गोविंद भाऊ आत्राम कोषाध्यक्षपदी मारुती पाटील वरारकर, सहसचिव पदी दुर्वास भाऊ बोथले, संघटक पदी जीवन भाऊ बोबडे यांची नियुक्ती करण्यात आली.

     यावेळी वणी तालुकाप्रमुख नितीन भाऊ गोरे,
वणी शहर प्रमुख अनिकेत भाऊ चामाटे, झरी तालुकाप्रमुख संतोष भाऊ सेंगर यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला शहर प्रमुख प्रेरणाताई काळे,महिला तालुकाप्रमुख शालुताई ढेंगळे.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे राजूभाऊ घागरे निखिल भाऊ बुच्चे आणि असंख्य प्रहारसेवक उपस्थित होते.





Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image