Type Here to Get Search Results !

जातनिहाय जनगणनेसाठी वणीत ओबीसींचा विराट एल्गार; शिवतिर्थावर घुमला हक्काच्या आकडेवारीचा आवाज


 
वणी :

         ओबीसी समाजाची अचूक व पारदर्शक जातनिहाय जनगणना करण्यात यावी, आगामी जनगणनेत ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा तसेच डिजिटल अर्जामध्ये अधिकृत जात यादीवर आधारित स्वतंत्र ड्रॉप-डाऊन मेन्यूची सुविधा द्यावी, या प्रमुख मागण्यांसाठी OBC (VJ, NT, SBC) जातनिहाय जनगणना समिती, वणी-मारेगाव-झरीजामणी यांच्या वतीने शुक्रवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२६ रोजी वणी येथील शिवतिर्थावर शांततापूर्ण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

       महात्मा गांधी जयंती आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दुपारी १२ ते ४ या वेळेत हे आंदोलन पार पडले. गांधीजींच्या अहिंसा व सत्याग्रहाच्या विचारांसोबतच लालबहादूर शास्त्री यांच्या साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि देशसेवेच्या मूल्यांचे स्मरण करत उपस्थितांनी लोकशाही मार्गाने आपल्या मागण्यांसाठी आवाज बुलंद केला.

        ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी शिक्षक, महिला, पुरुष, युवक-युवती तसेच विविध समाजघटकांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आंदोलनाला पाठबळ दिले. अनेक समाजबांधवांनी प्रत्यक्ष सत्याग्रह आंदोलनात सहभागी होत आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

📌 अचूक आकडेवारीशिवाय सामाजिक न्यायाची मोजदाद कशी ?

        ओबीसी समाजाची लोकसंख्या, सामाजिक व आर्थिक स्थिती आणि प्रतिनिधित्व याबाबत अचूक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी जातनिहाय आकडेवारी महत्त्वाची असल्याची भूमिका यावेळी आंदोलनकर्त्यांनी मांडली. जातनिहाय अचूक आकडेवारी उपलब्ध नसेल तर ओबीसी समाजाच्या वास्तविक लोकसंख्येचे आणि सामाजिक परिस्थितीचे योग्य आकलन कसे होणार, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

         सन २०११ मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जात जनगणनेतील जात नोंदणीच्या पद्धतीमुळे विविध नोंदी, स्पेलिंगमधील चुका आणि पोटजातींच्या नोंदींमुळे विसंगती निर्माण झाल्याचा मुद्दा समितीने यावेळी अधोरेखित केला. भविष्यातील जनगणनेत या त्रुटी टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अधिकृत OBC यादीनुसार डिजिटल ड्रॉप-डाऊन मेन्यूच्या माध्यमातून प्रमाणित जात नोंदणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

📌 गांधी-शास्त्री जयंतीदिनी लोकशाही मार्गाने सत्याग्रह :- 

        महात्मा गांधी यांच्या अहिंसा व सत्याग्रहाच्या विचारांना अनुसरून हे आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने करण्यात आले. त्याचबरोबर लालबहादूर शास्त्री यांच्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रसेवेच्या विचारांचे स्मरण करण्यात आले. समाजाच्या हक्काच्या आकडेवारीसाठी आणि योग्य प्रतिनिधित्वाच्या मागणीसाठी संविधानिक व लोकशाही मार्गाने सातत्याने पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित समाजबांधवांनी व्यक्त केला.

       आंदोलनाचे संचालन प्रदीप बोरकुटे यांनी केले. रघुनाथ कांडारकर यांनी प्रास्ताविकातून आंदोलनाची भूमिका व मागण्यांची सविस्तर माहिती दिली. गोविंद थेरे, मोरेश्वर वासेकर, नितीन मोहितकर, निलिमा काळे आणि मायाताई आसूटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शेवटी नारायण मांडवकर यांनी आभार मानले.

📌 शिक्षकांसह विविध समाजघटकांचा सहभाग :- 

         या सत्याग्रह आंदोलनात शिक्षकांसह महिला, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध समाजघटकांतील नागरिकांनी सहभाग नोंदविला. ओबीसी समाजाच्या जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी एकत्र येत उपस्थितांनी शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

       यावेळी मोहन हरडे, गजानन चंदावार, प्रदीप बोरकुटे, नारायण मांडवकर, सुरेश राजूरकर, अजय चन्ने, सविता रासेकर, सरिता पिंपळकर, रुपाली मोवाडे, निलिमा काळे, माया आसूटकर, हर्षदा मोवाडे, कविता राजूरकर, सुरेखा हरडे, निशा ढूमणे, मनीषा आवारी, अर्चना झाडे, शितल माटे, गजेंद्र भोयर, गुलाब वांढरे, भैयाजी पिंपळकर, लक्ष्मण ईद्दे, विलास गवारकर, जगदीश ढोके, किशोर ओचावार, मोरेश्वर वासेकर, अशोक चौधरी, शामराव घुमे, रघुनाथ कांडारकर, पांडुरंग पंडिले, रमेश येरणे, तानाजी पाऊणकर, रविंद्र राऊत, विनोद माहुरे, गोविंद थेरे, राजू पिंपळकर, राकेश बरशेट्टीवार, अशोक गौरकर, विजय गौरकर, नितीन मोहितकर, दिवाकर नरुले, उद्धव हेपट, शाम बोढे, रविंद्र कुर्ले, गजानन तुरारे, प्रकाश रिंगोले, राजेंद्र देवतळे, नंदप्रकाश खाडे, विनोद राजूरकर, किशोर परसावार, रविंद्र आंबटकर, सुरेंद्र बुच्चे, वैभव ठाकरे, अनिल टोंगे, अशोक खामनकर, दिलीप खामनकर, गुलाब आवारी, पांडुरंग कवरासे, नाना महाकुलकर, भास्कर सोमलकर, राजेश बोकडे, मारोती मोडक, वामन नक्षिणे, दत्तू महाकुलकर, काशिनाथ बुच्चे, शैलेश अडपावर, परिमल अंड्रस्कर, महेश खामनकर, विजय दोडके, आनंद घोटेकर, मंगेश खामनकर, राजेश बोकडे, वैभव येरगुडे यांच्यासह इतर समाजबांधव उपस्थित होते.

       ओबीसी समाजाची जातनिहाय अचूक जनगणना, स्वतंत्र कॉलम आणि डिजिटल पद्धतीने प्रमाणित जात नोंदणी या मागण्यांसाठी पुढील काळातही लोकशाही मार्गाने पाठपुरावा सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image