Type Here to Get Search Results !

इजहार शेख यांची काँग्रेसच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; वणी ट्रॅक्टर युनियनतर्फे सत्कार


 वणी : 


       भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षपदी मा. श्री. इजहार शेख यांची निवड झाल्याबद्दल वणी ट्रॅक्टर युनियनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.


       यावेळी ट्रॅक्टर युनियनच्या पदाधिकारी व सदस्यांनी इजहार शेख यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या निवडीमुळे वणी परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


       सत्कार कार्यक्रमाला धर्मेंद्र काकडे, धीरज पाते, अतुल बोबडे, अतुल हिवरकर, संतोष पिदुरकर, हरीश पाते, सुमित ठेंगणे, धीरज पेचे, अमोल लांबत, प्रमोद मिलमिल, आशीष कटकडे, योगेश येरणे, किशोर डौरे, नीलेश डौरे आणि योगेश बत्कल यांच्यासह वणी ट्रॅक्टर युनियनचे सदस्य उपस्थित होते.


      उपस्थितांनी इजहार शेख यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील सामाजिक व जनहिताच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

Top Post Ad

🔴 BREAKING NEWS
ताज्या बातम्या थेट WhatsApp वर
📲 आत्ताच JOIN करा

Below Post Ad

image